गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन घेवुन जाताना शेवगांव पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन आरोपींना केले जेरबंद..

प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. ०७ जानेवारी २०२५ या बाबत सविस्तर वृतांत असा आहे की फिर्यादी वय-४४ वर्षे रा. दत्त मंदौर जवळ वरुर रोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून दिनांक-०४ जानेवारी २०२५ रोजी यांच्या दाखल फिर्यादीवरून शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- १०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२), ७४, ८७, ३५१(३), ३(५) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन प्रतिबंध व संरक्षण अधिनियम २०१२ चे ८.१२ प्रमाणे दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील फिर्यादी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे येवुन नमुद गुन्हयातील आरोपी नावे ०१) अजिंक्य संजय खैरे रा. शेवगाव ता. शेवगाव याने माझ्या मुलीला (वय-१७) वर्षे हिला लग्नाचे आमिष दाखवुन आरोपी नामे ०२) रुषीकेश दत्तात्रय थावरे रा. शेवगाव ता. शेवगाव याने मोटार सायकल देवुन माझ्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावुन पळवुन घेवुन जावुन तिला जबरदस्तीने तिच्याशी लग्न करण्यासाठी तसेच तिचा हात पकडून तिस जवळ ओढुन तिच्या सोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला तसेच रुषीकेश थावरे याचे मदतीने अजिंक्य संजय खैरे याने तिचे अपहरन करुन घेवुन गेला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध मा. पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी योग्य वेळी वेगवेगळी दोन पोलीस पथके तयार करून पाथर्डी ह‌द्दीत तसेच दुसरे पथक शिरुर जिल्हा बीड ह‌द्दीत रवाना करण्यात आले होते. सदर मुलीचा तसेच आरोपीचा शोध घेत असतांना तांत्रिक तपासाच्या सहाय्याने तपास पथकाला माहीती मिळाली की पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी रोडने पाथर्डी येथील धायतडकवाडी गावाचे शिवारात असलेबाबत माहीती मिळाल्याने पिडीत मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेवुन आरोपीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ०१) अजिंक्य संजय खैरे रा. माळीगली ता. शेवगाव ०२) रुषीकेश दत्तात्रय थावरे रा. माळीगल्ली ता. शेवगाव असल्याचे सांगितल्याने सदर आरोपीस व पिडीत मुलीस ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन दोन्ही आरोपीस सदर गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्र. MH-16 -OQ – 2197 ही जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकों चंद्रकांत कुसारे, पोहेकों आकाश चव्हाण, पोकों शाम गुंजाळ, पोकों संतोष वाघ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों प्रशांत आंधळे, पोकों राहुल खेडकर, पोका संपत खेडकर, पोकों राहुल आठरे, पोकों एकनाथ गरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पौकों राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई प्रविण महाले हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!