महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

खाकीने गणेश विसर्जन व पैगबर जयंती काळातील केलेले नियोजन स्तूती योग्य..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २ ऑक्टोंबर २०२३ परवा दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महम्मद पैगंबर यांच्या जयंती व मिलादुन्नबी उत्साहाच्या निमित्ताने पूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या पोलिस प्रशासनाने केलेला बंदोबस्त, दिलेला पाठिंबा, प्रत्येक ग्रुपला बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हे सर्व नियोजन पूर्वक काम पाहून मी खूप प्रसन्न झालो. असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस राजन नायर बोलले.
पूढे ते बोलले हे नियोजन विशेषतः पिंपरी चिंचवड आयुक्त व्दारे, पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशन आणि दक्षता समिती व्दारे केले गेले. मी एक दक्षता समिती सदस्य या नात्याने इतकेच बोलू इच्छितो व आभारी आहे की, सन्माननीय आदरणीय पिंपरी चिंचवड शहर आयुक्त श्री. विनयकुमार चौबे (IPS), अतिरिक्त आयुक्त श्री. हेमंत परदेशी (IPS), उपायुक्त झोन २ श्री. विवेक पाटील, उपायुक्त वाहतूक नियंत्रण, श्री. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त श्री. सतीश माने, मुख्यालय आणि सर्व पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ पोलिस अधिकारी व गुन्हा खात्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, विशेषतः श्री. राम राजमाने साहेब, रूपाली बोबडे मॅडम, श्री. डाॅ. विवेक मुंगळीकर, श्री. भास्कर जाधव, श्री. जितेंद्र कदम क्राईम युनिट ४, पोलिस निरीक्षक श्री. नाईकवाडे, पोलिस निरीक्षक श्री. हरिश माने, आणि सर्व सहाय्यक पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक, सहाय्यक उप पोलिस निरीक्षक व सर्व पोलिस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, एल. आय. बी, एस. बी., एस. आय. डी., श्वान पथक व जलद कृती दल यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करितो.
मी मुस्लिम बांधवांचे व उरूस कमिटी अध्यक्ष युसूफ कुरैशी यांचे देखील आभार मानतो की, त्यांनी २८ सप्टेंबर रोजी असलेला ईद मिलाद हा सण गणपती विर्सजनामुळे ३० सप्टेंबर रोजी साजरा करून जे सहकार्य केले व सर्व कार्यक्रम शांततापूर्ण पार पडला यातून मानवतेचा संदेश समाजाला देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button