महाराष्ट्रशहरसामाजिक

पंचातारांकीत हॉटेल येथे पाठवून सेक्स रॅकेट चालविणा-यांवर कारवाई केले.

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड येथील पंचतारांकीत हॉटेल मध्ये काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली. त्यानंतर अशा दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखे कडील
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक ११/०५/२०२३ रोजी सापळा रचून, बनावट ग्राहका करवी वेश्यागमनासाठी
मुलींबाबत विचारणा केली असता, दलालाने वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल येथे रुम बुक करण्यास सांगितल्या. त्यानंतर सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन मुलींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, दलाल हा जवळच आजूबाजूच्या परिसरात
असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करुन, दोन पिडीत महिला व एक दलाल (आरोपी) मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४६२/२०२३ भादवि कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदरची एक पिडीत मुलगी भोजपुरी अभिनेत्री व एक पिडीत मुलगी ही मॉडेलिंग
करीत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सोो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे
सोो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सोो, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम,
मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर सो यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे,
पोलीस अमंलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!