उत्सवपिंपरी-चिंचवडपूणेभेटीगाठीमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची खासदार अमोल कोल्हे यांच्याशी निवडणुकी संदर्भात चर्चा..

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे घालणार लक्ष..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ नोव्हेंबर २०२५ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. आगामी होऊ घातलेली महापालिका निवडणूक आणि निवडणुकीच्या संभावित होणाऱ्या आघाड्यांच्या चर्चा या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हे यांच्या समोर भोसरी विधानसभेतील इच्छुक उमेदवारांनी आपले मत मांडले.
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले “लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतिकूल काळात भोसरी विधानसभेतील पक्षातील पदाधिकारी यांनी पक्षाचं काम अतिशय उत्तमरित्या पार पाडलं होतं. येणाऱ्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असेल. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरात मी वैयक्तिकरित्या लक्ष घालणार असून सत्ताधाऱ्यांच्या वतीने झालेल्या भ्रष्टाचारास तसेच चुकीच्या पद्धतीने केलेल्या राजकीय कारभार जनतेच्या समोर आणणार आहे. शहरातील जनतेने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत लाखोंच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदान केलं आहे. त्या मतदारांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या भोसरी विधानसभेच्या शिष्टमंडळात मा. नगरसेविका प्रियंका ताई बारसे, युवक प्रदेश पदाधिकारी राहुल पवार, भोसरी विधानसभा अध्यक्ष एडवोकेट संतोष शिंदे, उद्योजक विजय चौधरी, युवक उपाध्यक्ष प्रशांत काळेल, समाजसेवक गिरीश वाघमारे, शिवसेना अल्पसंख्याक नेते मुनाफ तरासगार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले “पक्षाचे विभाजन झाल्यानंतर लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत रक्ताचे पाणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाचे वतीने योग्य तो सन्मान दिला जाईल. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोसरी विधानसभेत सर्व प्रभागात उमेदवार यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून. खासदार अमोल कोल्हे साहेब तसेच शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या नेतृत्वात आगामी महापालिकेत मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी होतील यात दुमत नाही. लवकरच पक्षाच्या वतीने महापालिका लढणाऱ्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!