१६६ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन चिंचवड मधे संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ नोव्हेंबर २०२५ संगमनेर येथील स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथील सेंट फ्रानसिस झेवीयर चर्चच्या हॉल मध्ये १६६ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर जुलियन, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजन नायर, प्रसिद्ध उद्योजक विश्वास दळवी, प्रा. बोंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामाजिक उपक्रमाचे सामूहिक उदघाट्न झाले. यावेळी मान्यवरानी विवाह संबंधाने उपस्थितांना उत्तम मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्यात पुण्यासह औरंगाबाद, अहिल्यानगर, नागपूर , मुंबई इत्यादी परिसरातून १४५ हुन अधिक पालक व विवाहेच्छुक उपस्थित होते.
राफाएल आवारे यांनी प्रास्ताविक केले. संयोजक श्रीधर भोसले यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉमनिक कदम, स्यामुएल जाधव, निकलस खरात इत्यादीनी परिश्रम घेतले.



