सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी हरिश्चंद्र शिंदे तर पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी अध्यक्ष पदी विक्रम वाघमारे यांची निवड..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २२ नोव्हेंबर २०२५ दोन दिवसांपूर्वी दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२ ते ०४ या वेळेत सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेतील प्रमुख पदाधिकारी यांनी भिमसृष्टी, पुणे-मुंबई रोड, पिंपरी चौक येथे नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती प्रमाण पत्र वितरीत करण्यासाठी बैठक घेतली होती. यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमरत्न, प्रा.बी.बी.शिंदे हे होते.
यावेळी प्रा.बी.बी.शिंदे यांनी या सामाजिक संघटनेने २०१२ पासून केलेली समाज उपयोगी कामे व करावयाची पुढील कामे या सामाजिक संघटनेची पूढील दिशा, ध्येय, उद्देश, याविषयी नविन व जुन्या पदाधिकारीवर्गापुढे काय दिशा असावी यावर मार्गदर्शन केले.
यावेळी राज्य कार्यकारीनीचे उपस्थित पदाधिकारी यांना नियुक्ती प्रमाण पत्र वितरीत करण्यात आले ते खालील प्रमाणे.
महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारीनी
१) अध्यक्ष हरिश्चंद्र बी. शिंदे
२) उपाध्यक्ष दत्तोबा रंगनाथ रासकर.
३) उपाध्यक्ष अशोक धुराजी जावळे
४) संघटक देवीदास पारधे
५) सह संघटक रामभाऊ ओव्हाळ
६) कार्याध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड
७) प्रमूख सल्लागार प्रा. बी. बी. शिंदे
८) सल्लागार बाबुराव वक्ते.
९) सल्लागार तुकाराम गव्हाणे
पिंपरी चिंचवड शहर पुरुष कार्यकारिणी
१) अध्यक्ष विक्रम वाघमारे.
२) उपाध्यक्ष युवराज मस्के.
३) संघटक दयानंद कांबळे
४) सह संघटक दिलीप बनसोडे
५) कार्याध्यक्ष भारत घरड
६) सल्लागार कुसूम लोणके
पिंपरी चिंचवड शहर महिला कार्यकारिणी
१) अध्यक्षा सौ. शालनताई ओव्हाळ
२) सचिव सिमाताई गजभिये.
३) सहसचिव सौ. सावित्रीबाई शिंदे
४) कोषाध्यक्ष सुशिलाताई ओव्हाळ.
५) सदस्या निर्मला तुकाराम कुंभार.
६) सदस्य कमलताई दिलीप कुंभार.
८) सदस्य विमल शरद पवार.
मावळ तालुका कार्यकारिणी
मावळ तालुका अध्यक्ष पदी
प्रकाश बाबुराव घरबुडवे
यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उपस्थित नव निर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे यांनी मानले तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या.



