७६ व्या संविधान दिनानिमित्त संंत तुकाराम नगर पिंपरी, येथे स्वेटर व संविधान प्रास्ताविकांचे वाटप संपन्न…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ नोव्हेंबर २०२५ दोन दिवसांपूर्वी ७६ व्या संविधान दिनानिमित्त संंत तुकाराम नगर पिंपरी, येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नाम फलका जवळ बी. जी. एस. या शाळेतील विद्यार्थ्यांना वाढत असलेल्या थंडीचा आढावा घेतल्याने गरिब, होतकरुंना स्वेटर व संविधान प्रास्ताविका मा. योगेशजी बहल, माजी महापौर, मा.रमेश चिमूरकर सचिव पश्चिम महाराष्ट्र रिपाइं, मा. भास्कर बगाडे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते, मा. विलास समुद्रे सामाजिक कार्यकर्ते, मा. माधव अडसूळ अध्यक्ष जेष्ट नागरिक संघ, मा. सूरेश गायकवाड उपाध्यक्ष रिपाइं, मा. सत्यसेन सिरसाटे सचिव पंचशील संघ, मा. हेमंत मोरे पंचशील संघ, मा. गौरव खंडागळे योगा शिक्षक, उमेश चिमूरकर, साहेबराव चिमूरकर, मा. शिंणगारे, एफ. एस. गायकवाड पंचशील संघ जेष्ठ सदस्य, विनोद गवई, तसेच सा. कार्यकर्ते मा. बाबू नायर, मा. के. एम. बुक्तर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, विलास कांबळे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, इत्यादिंच्या हस्ते तथा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी बहूसंखेने विद्यार्थी व संत तूकाराम नगरचे नागरीक तसेच पिंपरी चिंचवड कर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा. रमेश चिमूरकर सचिव पश्चिम महाराष्ट्र यांनी केले होते.



