अभिवादनदेश-विदेशपूणेमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

संविधानाचा प्रचार प्रसार करण्याकरिता बाटीॅच्या वतीने संविधान जागरचे आयोजन..

प्रतिनिधी पूणे दि. ०६ डिसेंबर २०२५ संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्य समतादूता मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानाचे जागर या कार्यक्रमाद्वारे संविधानाचा प्रचार प्रसार करण्यात आला . त्यानिमित्य प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालय नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले आणि त्या कार्यक्रमाद्वारे संविधानाचे महत्त्व मूलभूत कर्तव्य हक्क जबाबदाऱ्या हे सांगण्यात आले तसेच भारतीय संविधान असेच कायम चिरकाल कसे टिकून राहतील यासाठी आपण प्रयत्न करावे असे आव्हान करण्यात आले.
मा. महासंचालक श्री. सुनील वारे , मा. निबंधक श्री. विशाल लोंढे, मा. विभागप्रमुख श्री. बबन जोगदंड यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती. शितल बंडगर यांच्या नियोजनअंतर्गत समतादूत श्री. प्रशांत कुलकर्णी व श्रीमती. संगीता शहाडे यांचे परिश्रमातून संविधान सप्ताह यशस्वीपणे पार पडला. या अंतर्गत विविध कार्यक्रम संविधानाला ७५ वर्षे पूर्ण निमित्य व्याख्यान तसेच प्रबोधन पर कार्यक्रम तसेच पोस्टर स्पर्धा, रॅली याचे आयोजन करण्यात आले तसेच हरघर संविधान या मार्फत प्रत्येक घरी जाऊन संविधानाची प्रास्तावीका व एक चमचा साखर देऊन तोंड गोड करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!