अभिनंदनउत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान विभागाचा “वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ” उत्साहात साजरा….

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ डिसेंबर २०२५ श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी स.१० वा. संस्थेच्या गुरु गणेश क्रीडा व सांस्कृतिक सभागृहामध्येविज्ञान विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात कु. आर्या बंडगर व चाहत तांबोळी यांच्या
गणेशवंदनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुनीता नवले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अनिल गुंजाळ यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ट्रस्टी श्रीमान सुमतीलालजी चंदनमलजी ओस्तवाल यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून श्री. जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान ॲड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व कार्यकारिणी सदस्य, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ श्रीमान रमणलालजी हजारीमलजी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून माईंड फुलनेस कोच श्रीमान डॉ. राम देवेंद्र गुडगिला तसेच पोलीस निरीक्षक, चिंचवड पोलीस स्टेशन सौ. डोंगरे मोहिनी अविनाश उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी मा. प्रा.श्रीमान अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरीया यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान. सुमतीलालजी चंदनमलजी ओस्तवाल यांनी आपल्या मनोगतातून “शिक्षणामुळे मुले घडत असतात. याच वयात व्यक्तिमत्त्व विकास घडणे गरजेचे असते. पौर्णिमेच्या चंद्रबिंबासारखे प्रकाशमान व्हा.” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान ॲड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा यांनी आपल्या मार्गदर्शनातून “ भावी नागरीक या नात्याने जीवनाच्या ज्या टप्प्यावर तुम्ही आहात तो तुमचं व्यक्तिमत्त्व घडविणारा असतो. व जीवन घडविणे तुमच्या हातात आहे”. असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान डॉ. राम देवेंद्र गुडगिला यांनी आपल्या मार्गदर्शनातून, “चांगल्या संस्कारातून विद्यार्थी घडत असतो. मोठ्यांचा सन्मान करा. आई वडीलांचा आदर करा.” असे सांगितले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी पोलीस निरीक्षक सौ. मोहिनी अविनाश डोंगरे यांनी आपल्या मनोगतातून “ जीवनात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे, व्यसनापासून दूर राहा.”असा संदेश दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख सौ. कालेकर तेजस्विनी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. तांबोळी ताहेरा सह विद्यार्थी प्रतिनिधी चि. गुरव निरज गजानन व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.फपाल ईश्वरी महादेव व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बोबडे प्रणिता यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!