पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

पिंपरी चिंचवड शहराला आता स्वतःचे हक्काचे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय” अ‍ॅड. उमेश राम खंदारे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. 23 जानेवारी 2026 पिंपरी चिंचवड शहरासाठी आनंदाची व अभिमानाची बातमी!
पिंपरी चिंचवड शहराला आता स्वतःचे हक्काचे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय” लाभत असून, त्याचे भव्य लोकार्पण रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. मोरवाडी येथील जुनी इमारत येथे होणार आहे.
ही केवळ प्रशासकीय घडामोड नसून, संपूर्ण शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः वकिलांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. न्यायव्यवस्था अधिक सक्षम, सुलभ व लोकाभिमुख होण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले गेले. यात शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी, बारचे माजी अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी, पोलीस प्रशासन, वकील बंधू-भगिनी, नागरिक यांचे कार्यक्रमाचे निमंत्रक व पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. उमेश राम खंदारे यांचे वतीने आभार मानण्यात आले.
न्यायाच्या हक्कासाठी एक ऐतिहासिक क्षण चला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया असे म्हणत खंदारे यांनी शहरातील सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचे निमंत्रक दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!