सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे व सौ. प्रमिता प्रमोद सोनवणे यांच्या सौजन्याने पिंपळे गुरव येथे नोकरी मेळाव्याचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. 26 जानेवारी 2026 सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे व सौ प्रमिता प्रमोद सोनवणे यांच्या सौजन्याने दिनांक २४/०१/२०२६ रोजी पिंपळे गुरव मध्ये प्रथमच भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, जवळकर नगर मध्ये श्रीकृष्ण मंदिर सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला, १० वी, १२ वी, पदवीधर व डिप्लोमा होल्डर, आय.टी.आय. झालेल्या उमेदवारांना करिता नोकरीची थेट मुलाखती आयोजित करून जागेवर नियुक्ती पत्र देण्यात आली, जवळपास २० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे प्रतिनिधी मुलाखती साठी आले होते. तसेच जवळपास २०० ते २५० उमेदवार मुलाखतीसाठी जमा झाले होते त्यापैकी अनेक उमेदवारांना नियुक्ती पत्र सादर करण्यात आले, अनेक तरुण तरुणींनी ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे व सौ. प्रमिता प्रमोद सोनवणे ह्यांनी केले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक मा. शशिकांत आप्पा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच युवानेते शंतून डोळस, संतोष भाऊ काची, अश्विन भाऊ खुडे, फिरोज शेख, सूरेश सकट, मनोहर पाटील उपस्थित होते, तसेच सामाजिक कार्यकर्ते अरविंद कदम, पराग कांबळे, विज्ञान रणदिवे उपस्थित होते



