उत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

श्री. गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेज मध्ये रक्षाबंधन व क्रांती दिन उत्साहात साजरा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पुणे, प्राधिकरण दि. ०८ ऑगष्ट २०२५ श्री. गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय व ज्यु .कॉलेज मध्ये रक्षाबंधन व क्रांती दिन संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगवले. या कार्यक्रमास संस्थेचे मानद सचिव ॲडव्होकेट आदरणीय राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया व सर्व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य हनुमंत मारकडसर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी चिंचवड प्राधिकरण येथील श्री. संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये योगा साठी उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधून परस्पर प्रेम, जिव्हाळा आणि संरक्षणाची परंपरा जोपासली. त्याचबरोबर, महाविद्यालयाचे प्राचार्य हनुमंत मारकड सर यांनी ९ ऑगस्टच्या ऐतिहासिक क्रांती दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. ‘भारत छोडो’ आंदोलनातील क्रांतिकारकांच्या त्यागाची आठवण करून देत त्यांचे योगदान विद्यार्थ्यांनी नाटिका, भाषणे आणि कवितांमधून मांडले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख कु. सोनाली गावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहिणींचा सण नसून परस्पर जबाबदारी आणि नात्यातील विश्वासाचे प्रतीक आहे. तसेच क्रांती दिन आपल्याला स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.सरिता फपाळ यांनी, तर आभार प्रदर्शन यशवंत जरांगेसर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. वैभव मोरे, तसेच प्रा. सौ. नीलम इस्ते आदी पालक व विद्यर्थिसमवेत उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!