अनेक प्रलंबित मागण्या व विकास कामाचा आढावा मा. मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आला..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २५ मे २०२६ भूमिपुत्रांचे खासदार श्री. सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) मागची दहा वर्षे भूमिपुत्रांच्या समस्या सरकार दरबारी कधीच पोहचल्या नाही.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची काल सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
– लोकनेते दि. बा. पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या विषयावर भूमिका घेत जनभावनांचा आदर राखत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आली.
– मुरबाड रेल्वे प्रकल्प हा भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ५०% निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
– वराळदेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासासाठी आवश्यक निधीपैकी २०% निधी राज्य शासनामार्फत देण्यात यावा, याबाबतही चर्चा झाली.
– भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व शाळा ‘स्मार्ट स्कूल’ करण्याबाबत, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत तसेच ज्या शाळांची अवस्था दुरुस्तीची आहे त्या शाळांच्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
– तुंगारेश्वर येथील पूज्य सदानंद महाराजांच्या मठाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध करून देण्याची ही मागणी करण्यात आली, जेणेकरून भाविकांना मोठा दिलासा मिळेल.
– भावली धरणाच्या टॅपिंग (पाणी उचलणी/जोडणी) विषयावरही सविस्तर चर्चा करून स्थानिक नागरिकांच्या पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
– भिवंडी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता भिवंडीमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) उभारण्यात यावे, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली.
– विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य आणि वाढीव मोबदला मिळावा, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली.
– भिवंडी शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) फेज-१ प्रकल्पासाठी अंदाजे ५०० कोटी खर्च अपेक्षित असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाने आवश्यक आर्थिक सहकार्य व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या समाधानासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू असून, जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत राहू असा विश्वास व्यक्त करतो असे यावेळी खासदार श्री. सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) बोलले.



