बी. व्हि. एम. इंडस्ट्रीज वराळे चाकण या कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील यांनी पाच लाख रूपयांची फसवणूक केल्याने कारवाईची मागणी :- हर्षद खान प्रो.प्रो. न्यू लाईफ बॅटरी

प्रतिनिधी चाकण दि. 04 फेब्रुवारी 2026 बी. व्हि. एम. इंडस्ट्रीज वराळे चाकण या कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील यांनी पाच लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याने कारवाई करण्या संदर्भात उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज देऊन मागणी करण्यात आली आहे.
पाच लाख रुपये बी. व्हि. एम. कंपनीच्या वराळे चाकण यांच्या खात्यात डिपोजिट अनामत रक्कम घेऊन स्क्रॅप न देता फसवणूक केल्याची तक्रारी अर्ज न्यू लाईफ बॅटरीचे प्रो. प्रो. ईश्वर परदेशी व हर्षद खान यांनी दिला आहे.
या तक्रारी अर्जात नमूद केले आहे की, वरील कंपनी मध्ये स्क्रॅप विकण्यासाठी आहे अशी माहिती आम्हाला श्री. अविनाश लोंढे यांनी दिली होती.
वरील कंपनीचे स्क्रॅप बाजार भावाप्रमाणे विकत घेण्यासाठी आम्ही तयारी दर्शवली. त्यानुसार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी स्क्रॅपसाठी लागणारे पाच लाख रुपये अनामत रक्कम डिपोजीट मी वरील कंपनी मध्ये आरटीजीएसने केले आहेत.

तक्रारी अर्जात म्हटले आहे की दि. १३ डिसेंबर २०२५ ते दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी आम्ही त्या वरील कंपनीचा माल खरेदी केला, व त्या स्क्रॅप मालाचे पेमेंट त्यांना हिशोब करून पूर्ण दिले. परंतु त्यानंतर जवळ पास दिड महिना उलटून सुद्धा त्यांनी आम्हाला परत दुसऱ्यांदा स्क्रॅप माल दिला नाही तसेच आम्ही दिलेले डिपोजिट अनामत रक्कम पाच लाख रुपये ही परत देत नाहीत.
म्हणून बी. व्हि. एम. कंपनीचे व्यवस्थापक सचिन पाटील व अविनाश लोंढे यांनी आमची फसवणूक केली आहे तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्क्रॅप उद्योजक ईश्वर परदेशी व हर्षद खान यांनी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडे केली आहे.



