पिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहर

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ फेब्रुवारी २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायदा विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व मिळकतींवर करण्यात येणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
शहरातील अनधिकृत बांधकामे व मिळकतींवर प्रभावी आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई करता यावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पिंपरी येथील मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक तसेच इतर संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यशाळेदरम्यान अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त राजेश आगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त कायदा सल्लागार देवेंद्र दीक्षित यांनी अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याची कार्यपद्धती, पंचनामा तयार करण्याची प्रक्रिया, कायदेशीर तरतुदी तसेच एम.आर.टी.पी. अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा योग्य व परिणामकारक वापर कसा करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक सक्षम, पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम होण्यास मदत होणार असून, महापालिकेच्या कारवाईत एकसंधता व कार्यक्षमता वाढण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!