उत्सवनाशिकमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

जागो ग्राहक जागो’च्या जयघोषात ग्राहक संरक्षण समितीचा भव्य ५ वा वर्धापनदिन संपन्न..

प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. ०३ मार्च २०२६ ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीने ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेला राज्यस्तरीय ग्राहक जनजागृती मेळावा, भव्य पुरस्कार वितरण सोहळा व मोफत आरोग्य-नेत्ररोग निदान शिबिर याने नाशिककरांना प्रेरणा दिली. सकाळचे संपादक व ज्येष्ठ विचारवंत उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या उपस्थितीत शेवंता बँक्वेट हॉल नांदूर नाका नाशिक येथे हा सोहळा साजरा झाला. शेकडो ग्राहक, समाजसेवक व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. संविधान प्रतिमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या पूजनाने सुरू झालेल्या कार्यक्रमात दादाभाऊ केदारे, कांबळे, तांबे व नगरसेविका दीपाली गीते यांनी आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. रक्तदाब, साखर तपासणी व नेत्र निदानासाठी शेकडो लोकांनी लाभ घेतला. अनुवाद आपला न्यूजच्या सह संपादिका व भोसला मिलिटरी स्कूलच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थिनी रेणूका भाऊसाहेब गायकवाड यांना मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स व ग्राहक संरक्षण समिती तर्फे ‘पत्रकारिता भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक प्रेरणादायी कामाची दखल घेऊन हा सन्मान त्यानां देण्यात आला. रेणूकाजींनी आपल्या कामातून ग्राहक जागृती व पत्रकारितेला नवे वळण दिले आहे, असे मान्यवरांनी यावेळी नमुद केले. महाराष्ट्रातील समाजसुधारक, पत्रकार व ग्राहक हक्क योद्ध्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कांबळे यांनी “विधानपरिषदेत ग्राहक संघटनेला प्रतिनिधीत्व मिळावे, ग्राहक कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी,” अशी मागणी करत ग्राहक ताकदीवर भर दिला. दुर्गाताई तांबे यांचे मार्गदर्शन व केदारे यांचे ‘जागो ग्राहक जागो, शुद्ध केले युद्ध, जब कोई ना सुने तो हमारे समिती को चुने’ या ब्रिदवाक्याने वातावरण मंत्रमुग्ध झाले. प्रमुख उपस्थिती: उपमहापौर विलास शिंदे, ॲड. प्रेरणा कुलकर्णी, नगरसेविका सुनिता भोजने व दीपाली गीते, राकेश जाधव, मनिष सानप, डॉ. नेहा शिरोरे, वैशाली राठोड, भाऊसाहेब जगताप, डॉ. अविनाश झोटिंग, ॲड. सविता शिंपी आदी. आयोजक आर्क. अक्षय कोठावदे, भागवत इरतकर, चंद्रकला साबळे, महेंद्र बेदमुथा, डॉ. अर्चना झोटिंग यांचे योगदान महत्त्वाचे. राष्ट्रगीताने सांगता व ॲड. सविता शिंपी, रामचंद्र ताठे, अंजली लाळगे यांचे आभाराने कार्यक्रम संपला. ग्राहक जागृतीला या सोहळ्याने नवी गती मिळाली!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!