देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

श्री. संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ वैद्यकीय व्यावसायिकंचा जाहीर मेळावा शनिवारी संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ मे २०२४ मावळ लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संजोग भिकू वाघेरे पाटील (चिन्ह – मशाल) यांच्या प्रचारार्थ वैद्यकीय व्यावसायिकंचा जाहीर मेळावा शनिवार दि. ४ मे २०२४, हॉटेल क्लोवर, येथे संपन्न झाला.
आपल्या मागण्या सक्षमपणे मांडण्यासाठी, व त्यांचा चिकाटीने पाठपुरावा करण्यासाठी एक सक्षम आणि खंबीर नेतृत्व आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड स्थित साधारण १७० डॉक्टर्स ने आपले समर्थन संजोगभाऊ वाघेरेंना एकत्र येवून दाखवले. कार्यक्रमात आघाडीचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते तसेच शहरातील मान्यवर देखिल उपस्थित होते.
यात मूख्य उपस्थिती डॉ. मनोज राका, डॉ. सुनील जगताप, डॉ. अभय तांबीले, डॉ. अर्चना वाघेरे, डॉ. सुजित पोखरकर, डॉ. अनिकेत अमृतकर, डॉ. वैशाली कुलथे, डॉ अभिजीत बाबर, डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. अंबादास पाटील डॉ. पवन सोनवणे, प्रतिष्ठित डॉ. शाम अहिरराव, डॉ. विकास पाटील, डॉ. सुमंत गरूड, डॉ. कुलथे, डॉ. श्रीकृष्ण जोशी डॉ. सुधीर भालेराव, डॉ. सुहास कांबळे, डॉ. संदीप बाहेती, डॉ. यशवंत इंगळे, डॉ. सत्यजित पाटील, डॉ. अजित पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. भरत सरोदे, डॉ. अमित कामत, डॉ. हेमंत क्षीरसागर, डॉ. अनिल रॉय डॉ. जबिन पठाण, डॉ. सायली बांबूर्डे, डॉ. सविता बाजरे,डॉ. सोनिया रोहरा, डॉ. ज्योतीराम पाटील, डॉ. संतोष पिंगळे, डॉ. सुजित लोंढे, डॉ. गणेश नरवडे, आदी उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन डॉ. मनिषा गरूड
अध्यक्षा डॉ. सेल पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसने केले होते. डॉ. अनिकेत अमृतकर, डॉ. अर्चना वाघेरे, डॉ. सुजित पोखरकर यांनी आपले विचार मांडले.
यावेळी प्रमुख उपस्थिती अणि मार्गदर्शन ॲड. असीम सरोदे, उमेदवार श्री. संजोग वाघेरे पाटील, तसेच शहरातील मान्यवर श्री. मानव दादा कांबळे, श्री. मारुती भापकर, श्री. सचिन भोसले, श्री. चेतन बेंद्रे, सुलभाताई उबाळे, श्री. योगेश बाबर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी सर्व डाॅक्टर्स व मान्यवरांनी एकच ध्यास, वाघेरे पाटलांच्या विजयाची आसचा नारा दिला.
यावेळी डॉ. अर्चना वाघेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्र संचालन डॉ. अनिकेत अमृतकर व डॉ. मनिषा गरूड यांनी केले. मनिषा गरूड यांनी शेवटी बोलताना त्यांनी आश्वासन दिले की लवकरच आपण वाघेरे पाटलांच्या विजयाच्या जल्लोसात भेटू हा आम्हाला विश्वास आहे असे बोलून मेळाव्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!