
प्रतिनिधी लोणावळा दि. ०५ मे २०२४ काल ३३ मावळ लोकसभा ओबीसी बहूजन आघाडीचे उमेदवार राहूल मदने यांनी प्रचारादरम्यान धनगर समाजाचे दैवत शिंग्रोबा महाराज यांच्या दर्शनार्थ बोर घाटातील मंदिरात जावून दर्शन घेतले यावेळी आमच्या प्रतीनिधीने उमेदवार राहूल मदने यांना शिंग्रोबांची माहीती विचारली ती सांगताना ते बोलले.
“सुमारे १८५० चा काळ, जर भारतावर राज्य करायचेच असेल, तर मुंबई ही भारताशी जोडली गेली पाहिजे. हे चाणाक्ष इंग्रजांनी ओळखले होते. यासाठी त्यांना रेल्वे मार्ग सुरू करायचे होते. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू केली पण पुढे ती भारताच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचे पण त्यामध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा मार्ग इंग्रजांना बरीच वर्ष सापडत नव्हता. एके दिवशी त्यांना बोरघाटामध्ये मेंढ्याचा कळप घेऊन जाताना एक धनगर दिसला. त्याने इंग्रजांना विचारलं तुम्ही काय शोधत आहात मी तुमची मदत करू शकतो का ? तेव्हा इंग्रज त्याच्याकडे पाहून कुत्सितपणे हसले. काही दिवसानंतर हतबल होऊन इंग्रजांनी त्या धनगराला आपली अडचण सांगितली. तेव्हा त्यांने अगदी सहज पणे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना मार्ग दाखवला. इंग्रजांनी त्या धनगराला बोलावून सांग तुला काय पाहिजे? अशी विचारणा केली असता त्यांनी मला जर काही द्यायचं असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या! असे म्हंटले. पण हे ऐकताच इंग्रज अधिकाऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या धनगरावर थेट गोळ्या झाडल्या. ही कहाणी आहे देशासाठी स्वातंत्र्य मागणाऱ्या स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर याची म्हणून मी राहुल निवृत्ती मदने मावळ लोकसभा मधून अपक्ष उभा राहून आपले पूर्वज शिंग्रोबा धनगर यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण जगाला एक मेंढपाळ इंजिनिअरने मार्ग दाखवाला तसाच मार्ग मलाही त्यांच्या दर्शनाने मिळावा मी समाजाचे काही देणे आहे. असे ते या वेळी बोलले
पूढे त्यांनी सांगीतले की म्हणून आज दिनांक ४ मे २०२४ शनिवार रोजी त्यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. पूढे प्रचारा दरम्यान ते मावळ पवना डॅम जवळील गुरुद्वाराला ही भेट दिली यावेळी श्री. अर्जुन सिंग यांनी खूप सार्या शुभेच्छा दिल्या व आम्ही आपल्या सोबत आहोत असे वचन ही दिले. पूढे हा झंजावात बाळुमामाचे भक्त व लोणावळ्याचे मा. सरपंच धनगर समाजाचे आदरनिय श्री. बबनभाऊ खरात यांना भेटले, भेटी दरम्यान विविध सामाजिक राजकिय विषयांवर चर्चा झाली यावेळी मनोभावे बाळुमामाचे दर्शन घेतले यावेळी श्री. खरात यांनी लोणावळ्यातून सहकार्य करण्याची ग्वाही दीली व भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा ही दिल्या. पूढे कर्जत कडे प्रचाराला निघाले असता कर्जत या ठिकाणी मेंडपाळ धनगर समाजाचे बंधू यांची भेट घेतली यांनी ही पूढील कारकिर्दी करिता भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी रखरखत्या उन्हात मेंढपाळ बांधवाला शेळ्या मेंढ्या राखताना पाहून राहूल मदने यांचे डोळे पाणावले प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की माझा धनगर समाज ३६५ दिवस उन वारा पाऊस सोसत भटकंती करून गूजरान करतो आहे. माझ्या भावंडांचा हा वनवास कधी संपणार ? पानावलेल्या डोळ्याने प्रचाराची आजच्या दिवसाची सांगता करत परतीच्या प्रवासाला निघाले.







