माणूसकीला काळीमा फासणारी घटना..बहीणीच्या मृतशवाचा सापळा चक्क स्टेट बँकेत आणला, (ओडिशा)

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ३० एप्रिल २०२६ ओडिशातील क्योंझर (Keonjhar) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एका भावाला चक्क तिचे शवाचा सापळा (कंकाल) कबरीतून बाहेर काढून बँकेत घेऊन जावे लागले.
ओडिशातील ओडिशा ग्राम्य बँक, मल्लीपासी शाखा, पाटणा ब्लॉक, जिल्हा क्योंझर.
कोणी केले हे कृत्य?:
जितू मुंडा (वय अंदाजे ५०-५५) या आदिवासी व्यक्तीने आपली बहीण कालरा मुंडा (वय ५६) हिचे शव नेले बँकेत.
बहीण केव्हा वारली?:
कालरा मुंडा यांचा मृत्यू २६ जानेवारी २०२६ रोजी झाला होता. त्या डायनाली गावात राहत होत्या.
जितू मुंडाला पैसे का हवे होते?:
त्यांच्या खात्यात १९,३०० ते २०,००० रुपयांच्या दरम्यान रक्कम होती. भावाला या पैशांची नितांत गरज होती.
बँकेची भूमिका आणि संताप:
भावाने अनेकदा बँकेत जाऊन बहिणीच्या मृत्यूची माहिती दिली होती. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांनी “खातेदार जिवंत नसेल तर पैसे मिळणार नाहीत, मृत्यू प्रमाणपत्र किंवा प्रत्यक्ष हजेरी हवी” अशी अट घातली होती.
या जाचक नियमांमुळे त्रस्त झालेल्या अशिक्षित भावाने अखेर आपली बहीण मरण पावली आहे हे सिद्ध करण्यासाठी, तिची कबर उकरून (Exhumed) तिचा सापळा/शव गोणीत भरून खांद्यावरून बँकेत आणले.
बँकेत शवाचे कंकाल (सापळा ) पाहून खळबळ उडाली आणि ग्राहकांची धावपळ झाली.
ही घटना समजल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली.
त्या भावाला पैसे मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात आली, अशी माहिती मिळते.
या घटनेमुळे सरकारी बँकांमधील अत्यंत कठोर नियम आणि सामान्य माणसाची होणारी कुचंबणा यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या घटनेचा विडीओ व फोटो सद्या सोशल मिडियावर भरपूर व्हायरल होत आहे.
या घटनेतून हेच समजते की सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे. शिक्षण हे सर्वांना मोफत व उच्च दर्जाचे असायला हवे तेव्हांच जनसामान्याला शासकीय, निमशासकीय, बँका व इतर शासकीय संस्थान यांचे नियम कळतील. यामूळे भविष्यात अशा घटना घडणार नाही.
जनसामान्यातून एक सवाल केला जातोय – या व अशा घटनानवरुन काय आम्ही स्वताः ला विश्वगुरू म्हणून शकतो?



