आंदोलनपिंपरी-चिंचवडभेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाले व होकार्स यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवशाही व्यापारी संघ सदैव कटिबध्द :- युवराज दाखले

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. १३ मार्च २०२६ फेरीवाला हाकार्स महासंघाच्या वतीने पुढील मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
१) पथविक्रेता लाभार्थ्यांनी १४०० रुपये त्यांना लायसन व ओळखपत्र मिळाले पाहिजे.
२) पथविक्रेताचे १४०० रुपये नोंदणी शुल्क बंद केलेले आहे ते सुरू करण्यात यावे.
३) अतिक्रम पथकाकडून वादवाद झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येऊ नये
४) आधी पक्क्‌या गाळ्यात पुनर्वसन पक्के झाले पाहिजे.
५) पथविक्रेता (उपजिविके संरक्षण व पथविक्रेता) महाराष्ट्र योजना २०१७ कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
६) गटई कामगारांना आहे त्या ठिकाणी जागा देण्यात यावी.
७) स्मार्ट सिटीत हॉकर झोनला प्राधान्य दिले पाहिजेल.
८) अतिक्रमण पथकाने जप्त केलेली हातगाडी, टपरी व माल ते दुसऱ्या दिवशी परत दिला पाहिजे. या फेरीवाले व होकार्स यांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन कामगार नेते प्रल्हाद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
या मोर्चाला शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने सक्रिय जाहीर पाठिंबा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला.
दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व विक्रांत बगाडे यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली व मागण्या मान्य करून योग्य ते निर्देश दिले.
यावेळी नेते मानव कांबळे, संदिपान झोंबाडे, प्रल्हाद कांबळे, मार्गदर्शक डी पी खंडाळे, प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, उपनेत्या उषामाई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गायकवाड, उत्तम सकटे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!