अभिवादनउत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशोध इतिहासाचा..सामाजिक

बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती व बौद्ध समाज विकास महासंघ, टाटा मोटर्स बुद्धिस्ट फ्रेंड सर्कल, समता सैनिक दल, व अशा अनेक संघटन, समित्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जंयती महोत्सव-२०२६चे आयोजन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ मार्च २०२६ जगातील सर्वांत महान शासनकर्ते म्हणून ओळखले जाणारे तसेच बुद्ध धम्माला जागतिक किर्ती देणारे धम्मराजा प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देणे ही काळाची गरज आहे. कारण हा महान सम्राट कित्येक शतके संपूर्ण जगासाठी अज्ञात होता. आज २३०० वर्ष लोटली पण आजही या सम्राटासारखा कर्तृत्ववान आणि आपल्या जनतेसाठी दिवसरात्र राबणारा सम्राट झाला नाही. म्हणून सम्राटाचे कर्तुत्व भावी पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या सम्राटाचा गुणगौरव या महोत्सवाद्वारे करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. आयु भाऊसाहेब डोळस (बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष)
स्वागत अध्यक्ष – मा. आयु राजू भालेराव ( इतिहास प्रेमी पाली भाषा व विविध लिप्यांचे अभ्यासक)
सूत्रसंचालन – मा. आयु नामदेव वाळके
सत्कारार्थी – समाधान सोनवणे व जोत्सना मोरे (लेणी संवर्धक), संतोष मोरे, कैलास पाटील, भास्कर पानपाटील, जयश्री शिरसाठ,

कार्यक्रमाचे स्वरूप.
१) सकाळी १०:०० वा. – प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण (हस्ते अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिं.चिं मनपा)
२) सकाळी १०:१५ वा. – पंचशील ध्वजारोहण बुद्ध वंदना सूक्त पठाण (भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर)
३) सायं. ०५ ते ०७ – प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक प्रमुख आकर्षक ( दिया स्ट्रीट डान्स ग्रुप)
४) रात्री ०७ ते ०८ – व्याख्यान: व्याख्याते मा. आयु प्रा. प्रकाश पवार सर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे.
विषयः प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि बुद्ध धम्म.
५) रात्री ०८ ते १० – महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे प्रस्तुत गाथा युगपुरुषांची.

टिप:- प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ (चैत्र शुक्ल अष्टमी) या दिवशी असनार आहे याची सवांनी नोंद घ्यावी असे आयोजकांच्या वतिन सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी चिंचवड ४११०१८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!