मालमत्ता करातील दंडात देण्यात येणाऱ्या ९०% सवलतीच्या “अभय योजना” मध्ये मुदतवाढ मिळावी म्हणून मा. महापौर यांना मनसे शहराध्यक्षांचे निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ मार्च २०२६ पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी पालिकेने दंडाच्या शुल्कात ९०% सवलतीसाठी “अभय योजना” लागू केली आहे. त्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि आपल्या पालिका हद्दीतील बहुसंख्य नागरिक हे कामगार प्रवर्गातील असून त्यातील बहुतेकांचे पगार हे १० तारखेच्या आसपास होतात. त्यामुळे त्यांना एकरकमी एवढी रक्कम जमवणे शक्य होत नाही. व त्याच प्रमाणे “झोपडपट्टी धारक” यांना अभय योजना मध्ये पैसे भरण्यासाठी तीन ते चार टप्पे करुन देण्यात यावेत ही तरी कृपया करून आपण सदरील गोष्टीचा विचार करून अभय योजनेमध्ये मुदतवाढ द्यावी अशी आपणास नम्र विनंती.
अशा स्वरूपाचे निवेदन मा. महापौर यांना देण्यात आले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसे सचिव मनोज लांडगे, कामगार सेना नितीन सुर्यवंशी, शाखा अध्यक्ष सुधाकर अर्जुन आणि
बंटी कांबळे व आजम शेख उपस्थित होते.



