पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहर

कॉपीराईट धाडी विरोधात व्यापाऱ्यांचे बंदचे हत्यार व्यापाऱ्यांनी एकजुट दाखवावी – श्रीचंद आसवानी

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ मार्च २०२६ पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांना कॉपीराईटच्या नावाखाली धाड टाकण्यासाठी आलेले अधिकारी विनाकारण त्रास देतात. कोणत्याही कायद्याचे पालन न करता व्यापारी वर्गाकडून पैसे उकळण्याचा त्यांचा उद्देश असतो, असा प्रकार यापूर्वी तीन वेळा पिंपरी कॅम्प मध्ये घडलेला आहे. त्याची पुनरावृत्ती सोमवारी दुपारी होत होती, परंतु व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे अधिकाऱ्यांना परत फिरावे लागले, व्यापाऱ्यांनी एकजुट दाखवावी व अशा बेकायदेशीर धाडी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध पुढे येऊन प्रतिकार करावा असे आवाहन पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी केले.
सोमवारी (दि. ३०) दुपारी पिंपरी कॅम्प येथील साई चौक परिसरात एका दुकानात कॉपीराईट तपासणीच्या नावाखाली काही अधिकाऱ्यांनी प्रवेश केला. याची माहिती काही वेळात पिंपरी कॅम्प मधील सर्व व्यापाऱ्यांना कळाली. व्यापाऱ्यांनी ताबडतोब दुकाने बंद करून दंडेलशाही करणाऱ्या कॉपीराईट अधिकाऱ्यांच्या विरोधात साई चौक परिसरात एकजुट दाखवून एकत्र आले व्यापाऱ्यांची एकजूट आणि तीव्र विरोध पाहता धाड टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत फिरावे लागले. पिंपरी कॅम्प मधील बहुतांशी सर्व व्यापाऱ्यांनी सुमारे तीन तास दुकाने बंद ठेवली होती अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!