
प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. ०३ एप्रिल २०२६ आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत प्रीपेड मोबाईल ग्राहकांच्या हक्कांचा मुद्दा उचलत, रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल आणि एसएमएस बंद करण्याच्या टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी धोरणांवर कडाडून टीका केली आहे. रिचार्ज संपल्यावरही इनकमिंग सेवा सुरू ठेवण्याची आणि २८ दिवसांऐवजी महिन्याचा प्लॅन देण्याची मागणी त्यांनी केली.
राघव चड्ढा यांनी मांडलेले मुख्य मुद्दे आणि मागण्या:
इनकमिंग सेवा बंद करणे चुकीचे: रिचार्ज संपल्यावर आउटगोइंग बंद होणे समजण्यासारखे आहे, मात्र इनकमिंग कॉल्स आणि महत्त्वाचे OTP मेसेज बंद करणे ही ग्राहकांची लूट आणि मनमानी आहे, असे ते म्हणाले.
२८ दिवसांचा घोटाळा: टेलिकॉम कंपन्या २८ दिवसांचा रिचार्ज देऊन वर्षातून १३ वेळा रिचार्ज करायला भाग पाडतात, जे चुकीचे आहे. रिचार्ज प्लॅन कॅलेंडर महिन्याप्रमाणे असावेत.
न वापरलेला डेटा रोलओव्हर: दररोजचा न वापरलेला मोबाईल डेटा (Data) वाया न जाता तो पुढे कॅरी-फॉरवर्ड (Rollover) व्हावा किंवा इतरांना ट्रान्सफर करण्याची सुविधा असावी, अशी मागणी त्यांनी केली.
कमी दरातील प्लॅन: रिचार्ज संपल्यानंतरही कमीत कमी एका वर्षासाठी इनकमिंग आणि एसएमएस सेवा सुरू राहील असा स्वस्त प्लॅन असावा.
राघव चड्ढा यांनी यासंदर्भात टेलिकॉम कंपन्यांच्या नियमात सुधारणा करून सामान्य मोबाईल ग्राहकांना दिलासा देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. ३०दिवसाचे रिचार्ज व इनकमिंग निशुल्क, डेटा पुढील रिचार्ज मध्ये एड करावा. ज्या सुविधा पुर्वी अविरत चालू होत्या दरवेळी वाढीव दर व मनमानीला आळा बसावा.



