घोटाळेपिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषसामाजिक

वाढ व घट या नावाखाली वर्गीकरणाच्या सुमारे ५२ कोटीच्या रु. बोगस उपसूचनांवर सह्या करणारे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची सखोल चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करा-मारुती भापकर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बहुचर्चित र.रु.५२ कोटी रक्कमेच्या बोगस उपसूचना या गंभीर प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे, सुलभा उबाळे नगरसेवक निलेश बारणे यांनी शुक्रवार दि. १०/०४/२०२६ रोजी पत्रकार परिषद घेऊन या बोगस उपसूचनांवर सह्या करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्षाचे नगरसेवक नाहीत. आम्हाला विचारल्याशिवाय कुठल्या ही सह्या करायच्या नाही तशी तंबी आम्ही आमच्या नगरसेवकांना दिली आहे. असे छातीठोकपणे दावा केला होता.
सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या या बोगस उपसुचनांवर सह्या आहेतच. त्याचबरोबर पुणे ग्रँड चॅलेंज टूर pgct-2026 च्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची सुधारणा कामे करणे राजीव गांधी पूल सांगवी किवळे रस्ता भक्ती शक्ती व एम्पायर इस्टेट फुल ते काळेवाडी फाटा यासाठी वाढ व घट ४ कोटी २० लाख उपलब्ध करून द्यावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रमोद कुटे व अरुणा लंगोटे यांनी बोगस उपसूचनेवर सह्या केलेल्या आहेत.
त्याचबरोबर याच pgct विषया अनुषंगाने र. रु.१०कोटी ५०लाख रु बोगस उपसूचनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर व यश साने यांच्या स्वाक्षरी देखील बोगस उपसूचनेवर आहेत.
तसेच “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तोंडघशी” या मथळ्याखाली माध्यमांमधून बातम्यामध्ये नगरसेवक प्रमोद कुटे व अरुणा लंगोटे यांच्या बोगस उपसूचनेबाबत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना दि. १३ एप्रिल २०२६ रोजी पत्र देऊन महापालिका सभागृहातील तरतूद वाढ व घट करण्याच्या कोणत्याही उपसूचनेवर मी स्वाक्षरी केलेली नाही सदर बोगस उपसूचनांशी माझा कोणताही संबंध नाही सदर प्रकरणांमध्ये विनाकारण माझे नाव ओढले जात असून बोगस उपसूचनांवर माझी स्वाक्षरी असल्याचे माध्यमांमध्ये छापून आलेला मजकूर समाजाची दिशाभूल करणारा आहे सदरील बातमीमुळे माझी व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने सखोल चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. असे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलेले आहे.
हे पत्र प्रसिद्धिस देऊन नगरसेवक प्रमोद कुटे नागरिकांची व प्रशासनाची दिशाभूल करत आहेत. उपसूचनेवरील स्वाक्षरी प्रमोद कुटे यांचीच असून ते धडधडीत सपशेल खोटे बोलून पिंपरी चिंचवडकरांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत.
काल १५ एप्रिल २०२६ महापौर रवी लांडगे, सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, यांनी स्थायी समिती सभागृहात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे व अरुणा लंगोटे यांच्या स्वाक्षरी असल्याचा उल्लेख सभापती बारणे यांनी देखील केला‌ आहे. त्यांनी प्रमोद कुटे यांच्या दि.१३ एप्रिल २०२६ च्या पत्राचा उल्लेख करून या सह्या खऱ्या की खोट्या हे चौकशीत पुढे येईलच असे म्हटले आहे.
त्यामुळे अशा प्रकारे दुटप्पी व खोटारडी भूमिका मांडून पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल करणारे नगरसेवक प्रमोद कुटे व राष्ट्रवादीचे बोगस उपसूचनांवर सह्या करणारे सर्व नगरसेवक, सत्ताधारी भाजपाचे सर्व नगरसेवक यांच्या उपसूचनेवर असणाऱ्या नगरसेवकांपैकी किती नगरसेवकांच्या सह्या खऱ्या किंवा खोट्या हे आपल्या समितीने प्रथम जाहीर करावे.
अशाप्रकारे दि. २४/०३/२०२६ रोजी अंदाजपत्रक मंजुर होऊन लॉक झालेले असताना थेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या सूचनेनुसार ठेकेदारांच्या बोगस (दिनांक, ठराव क्रमांक नसताना) उपसुचनांवर सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे कायदेशीर की बेकायदेशीर याची सखोल चौकशी करून हे काम जर बेकायदेशीर असेल तर संबंधित सर्व उपसूचनांवर स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांवर प्रशासनाच्या वतीने तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!