अभिनंदनउत्सवभेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. ३५०० सभासद शाळांना घड्याळ वाटप कार्यक्रम संपन्न..

आंबवणे येथील वाळंज विद्यालयात सेकंडरीचे तज्ञ् संचालक मा. गुलाबराव गवळे यांची भेट..

प्रतिनिधी आंबवणे ता. मुळशी दि. २२ एप्रिल २०२६ कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ता. मुळशी या शाळेच्या वतीने घड्याळ वाटप व सभासद भेट वस्तू वाटप करण्यात आले.
सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुबंई शाखा लोणावळा अंतर्गत घड्याळ वाटप साठी सोसायटीचे तज्ञ् संचालक मा. गुलाबराव गवळे, कोषाध्यक्ष शिक्षक परिषद पुणे, अध्यक्ष शिक्षक परिषद पुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भटू देवरे व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

सेकंड्री स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी ही शिक्षक कर्मचारी यांच्या उज्वल गुंतवणूक व गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रराज्यातील अग्रगण्य संस्था आहे सेकंडरी अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सर्वच संचालक यांच्या मार्गदनाने वाटचाल करत असताना सभासदांचे हीत जोपसण्याचे कार्य निश्चित करत आहे. सुवर्णं महोत्सवी वर्षा निमित्त सभासद शाळांना घड्याळ भेट देण्यात आले.
आज पर्यत ३५०० सभासद शाळांना भिंतीवरील घड्याळ व प्रत्येक सभासदास भेट वस्तू वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणाले की आपल्या शाळेस भेट देऊन आनंद झाला. निसर्ग रम्य परिसर व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे कार्य संस्थापक आदरणीय नंदकुमार वाळंज व मुख्याध्यापक देवरे सरांच्या नेतृत्वात होत आहे. असे मत सोसायटी चे तज्ञ संचालक मा गुलाबराव गवळे यांनी व्यक्त केले. यावेळी रवींद्र सोनवणे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, महादेव खेडकर, संतोष दळवी, उपस्थित होते.संजय कुलथे यांनी पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन केले. तसेच मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!