पूणेमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव साळवे यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा..

प्रतिनिधी पूणे दि. २२ एप्रिल २०२६ आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव साळवे यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . त्या निमित्त डॅा. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महात्मा फुले यांचे द्विशताब्दी वर्ष, महाड चवदार तळे संग्राम शताब्दी वर्ष अभिवादन व पुढील वाटचाल या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेत माजी आमदार व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. जयदेवराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना आंंबेडकरी चळवळीच्या सद्य स्थितीवर भाष्य करताना विचार मांडले की, एकीकडे देशात डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटने बाबत संपूर्ण देशभर चर्चा केली जाते, संविधानाच्या प्रभूत्वाची चर्चा करताना बाबासाहेबांच्या योगदाना बद्दल प्रचंड स्तुती सुमने उधळली जातात. परंतु प्रत्यक्षात वास्तव काय आहे असा प्रश्न उपस्थित करून ॲड. गायकवाड यांनी सविधानाची अंमलबजावणी होत नसून डॅा. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही अस्तीत्वात येत नाही या बद्दल खंत व्यक्त केली. देशात जातींचे राजकारण एवढे टोकदार झाले असून तळागाळातले मागास समाज सत्ते पासून वंचित आहेत. राजकारणात धनदांडगे, सरंजामी व सामंतशहांच्या ऊत्तभ्रूंत वर्चस्वामुळे दलित मागासवर्गिय निवडणूकांच्या परिघातून दूर फेकले आहेत. केवळ राजकारणातल्या जातीयवादामुळे स्वतः बाबासाहेब निवडणुकीत पराभूत झाले. आंबेडकरवादी विचारवंतांनी ही झालेली कोंडी कशी फोडायची यावर विचार केला पाहिजे. तथाकथित ऊच्चभ्रू हिंदुत्व वाद्यांनी दलित मागासवर्गीयांत भांडणे लाऊन दिली आहेत. त्यामुळे दलित राजकारण पराभूत होत आहे.
या प्रसंगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ संविधान अभ्यासक सुभाष वारे व जेष्ठ विधीज्ञ एडवोकेट शारदा वाडेकर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल आण्णा जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे मनोगत व्यक्त केले की वसंतराव साळवे हे आंबेडकरी चळवळीतील ज्ञानाचा खळखळता धबधबा आहेत ते आंबेडकरी कार्यकर्त्यांचे ऊर्जा स्त्रोत आहेत, त्यांच्यासारखा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही. या व्याख्यानाचे संयोजन नागेश भारत भोसले यांनी केले याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड, रमेश राक्षे, अंकल सोनवणे, सचिन बगाडे, आकाश साबळे, अरविंद तायडे, शैलेंद्र चव्हाण, दिलीप कुसाळे, सचिन बनसोडे, सुदीप गायकवाड व मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!