उत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

कामगार दिन आणि बुद्ध जयंती निमित्त भिमशक्ती संघटनेचा निगडी कामगार नाका निगडी शाखा येथे अभिवादन व कामगार सन्मान कार्यक्रम सम्पन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ मे २०२६ काल ०१ मे कामगार दिन आणि बुद्ध जयंती या ऐतिहासिक दिवसांच्या निमित्ताने भिमशक्ती संघटना, निगडी शाखेच्या वतीने कामगार नाका येथे भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कामगार नाका शाखेच्या फलकास उपाध्यक्ष श्री. सुनिल ससाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रमिक शक्तीला अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांना दृढ सलाम करण्यात आला.
कामगारच देशाचे खरे शिल्पकार आहेत!
या भूमिकेतून, श्रमिक बांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहराध्यक्ष श्री. सूरज भाऊ गायकवाड यांच्या हस्ते कामगारांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
भिमशक्ती संघटनेचा ठाम निर्धार:
कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील..
अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरू..
संविधानिक मूल्यांसाठी झुंज देऊ..

या प्रसंगी सूरज गायकवाड (शहराध्यक्ष), सुनील ससाणे (उपाध्यक्ष), लक्ष्मण साळुंके (संपर्क प्रमुख), धनंजय वाघमारे, (निगडी शाखा महासचिव )नारायण मांजरे, (निगडी शाखा महा सचिव ) दत्ता जावळे,(निगडी शाखा उपाध्यक्ष ) शशिकांत जोत्रे,(निगडी शाखा सचिव ) सुभाष वाघमारे, (निगडी शाखा उपाध्यक्ष )रमेश रोकडे,(निगडी शाखा कोषाध्यक्ष) संदीप लांडगे, (निगडी शाखा उपाध्यक्ष ) उमेश मांजरे, (निगडी शाखा सचिव ) सतीश सूर्यवंशी, सतीश अडागळे, संदीप राठोड तसेच असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!