
प्रतिनिधी कात्रज पूणे दि. ०२ मे २०२६ सर्वे नंबर ३६ कात्रज येथील महादेव नगर, आर.के. कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळ परवा रात्री एका अज्ञात व्यक्तीची निर्दयीपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी बहुजन न्याय पॅंथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन नडेकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यात ते म्हणतात की भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आमच्या परिसरात नियमित पोलीस पेट्रोलिंग सुरू करावे.
सदर पाण्याच्या टाकी परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असतो, त्यामुळे बाहेरील लोक येऊन तेथे दारू पिणे व संशयास्पद हालचाली करणे सुरू असतात. त्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. तरी सदर ठिकाणी लवकरात लवकर योग्य ती प्रकाशयोजना करावी. व पोलीस गस्त ही वाढवावी. संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवावे. याबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निवदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.



