विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांची जयंती ऐतिहासिक भिमसृष्टी पिंपरी या ठिकाणी पहिल्यांदाच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ मे २०२६ परवा दि. ०१ मे रोजी बुद्ध जयंती निमित्त सायं ७:०० वा विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा. अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मारक समितीच्या सदस्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांच्या बुद्ध प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.
सायं ७:१५ वा बुद्ध वंदना सूत्त पठण घेण्यात आले यावेळी मा. अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी बुद्ध जयंतीच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
सायं:७:३० वा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने खीर दान करण्यात आले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध अनुयायी/ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने सर्वांचे स्वागत व सर्वांना विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



