गून्हादेश-विदेशमूंबईविशेषसामाजिक

प.बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०७ मे २०२६ पं. बंगाल मध्ये कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा,
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे, अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेले सुवेंद्रु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मध्यमग्राममधील दोहारिया इथं ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात अधिकारी यांचे पी.ए. चंद्रनाथ रथ यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प. बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपकडून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. सुवेंद्रु अधिकारी हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे. त्यांचं नाव आघाडीवर आहे. अशातच मध्यमग्राम भागात अधिकारी यांचे खासगी पीए चंद्रनाथ रथ यांची गोळी झाडून हत्या कऱण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून सहकाऱ्यांसोबत जात होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरून ३ जण आले आणि त्याांनी रथ यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये रथ यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी जवळून रथ यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर ४ गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी ही डोक्यात लागली असल्याची माहिती समोर आली आहे. छाती आणि पोटातही गोळ्या झाडण्यात आल्या आहे. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर बेछुटपणे गोळीबार केला.
चंद्रनाथ रथ हे  सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय समजले जातात. ते त्यांचे खासजी सचिव म्हणून काम पाहत होते. एक विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. निवडणुकीच्या काळात रथ यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!