अपघातपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषसामाजिक

खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला महामार्गावर अपघात; सुळे व वाहनचालक सुरक्षित

प्रतिनिधी मावळ दि. १० मे २०२६ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना काल घडली. GJ 13 CF 5257 या क्रमांकाच्या वाहनाने बेदरकारपणे वाहन चालवत त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात सुप्रिया सुळे व वाहनचालक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. संबंधित वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. अतिवेग आणि बेदरकार वाहनचालना ही गंभीर समस्या बनत असून वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!