आर्थिकघोटाळेपिंपरी-चिंचवडफसवणूकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सर्वे नंबर १०० विठ्ठल नगर झोपडपट्टी मे. साई मिरॅकल डेव्हलपर्स यांच्यावर मटरेल अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ मे २०२६ विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी संबंधित झोपड्या मोकळ्या करून घेण्यात आल्या आहेत. सदर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या मालकीचे विद्युत पोल, विद्युत तारा, वायर, बसबार, मिनी बॉक्स, फोर वे, विद्युत वाहिनी केबल तसेच इतर विद्युत साहित्य अस्तित्वात होते.

सदर झोपड्या हटविण्याचे काम मे. साई मिरॅकल डेव्हलपर्स साई प्लाझा झिरो बॉईज चौक नेहरूनगर यांनी केलेले असून, झोपड्या काढून घेतल्यानंतर महावितरण कंपनीचे वर नमूद केलेले साहित्य संबंधित विभागाकडे परत करणे आवश्यक होते. मात्र मे.साई मिरॅकल डेव्हलपर्स यांनी सदर साहित्य परत न करता त्याचा अपहार केलेला आहे. सदर साहित्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असून, हा प्रकार गंभीर आर्थिक गैरव्यवहार, सरकारी मालमत्तेचा अपहार व चोरी स्वरूपाचा आहे.

त्यामुळे संबंधित डेव्हलपर्स व जबाबदार व्यक्तींवर आणि आपल्या विभागातील लाईनमन यांच्यावर खालीलप्रमाणे भारतीय न्याय संहिता (BNS) / भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे :

१) कलम ३०३ – चोरी करणे
२) कलम ३१६– विश्वासघात / अपहार करणे
३) कलम ३१८ – फसवणूक करणे
४) कलम ३०५– सरकारी अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे
५) कलम ६१(२) – सामूहिक हेतूने गुन्हा करणे

तरी सदर संबंधित मे.साई मिरॅकल डेव्हलपर्स व इतर जबाबदार व्यक्तींवर आणि आपल्या विभागातील लाईनमन यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच महावितरण कंपनीचे अपहृत साहित्य परत मिळवून देण्यात यावे असे वंचित बहुजन आघाडीचे ईश्वर कांबळे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित भोसरी विभाग कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!