पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महाकवी, महान साहित्यिक, डॉ. वामनदादा कर्डक, यांचा १५ ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव, महानगरपालिकेच्या माध्यमातून साजरा करण्यात यावा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ मे २०२६ लोक भाषेची ” माहुतगिरी” करणारे महाकवी डॉ. वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ मध्ये तबाजी कर्डक व सईबाई या दाम्पत्याच्या पोटी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दुसोंडी या लहानशा खेड्यात झाला असून यांनी पुर्ण महाराष्ट्रातच नव्हे या देशाच्या सिमा पार करून, सातासमुद्रापार करून आपण महाकवी असल्याची, वैज्ञानिक दृष्टिकोनातुन समाज प्रबोधनाची छाप पाडली.
साहित्यसम्राट, महाकवी, प्रबोधनकार, डॉ. वामनदादा कर्डक यांची साहित्य संपदा दहा हजार (१०,००० ) च्या पुढे गिते लिहिली व गायली असुन, माझे जीवन गाणे हे आत्मचरित्र खुप गाजले आहे. त्यांची तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती, उद्देशा प्रती, अंधश्रद्धा निर्मुलन पर, प्रबोधनाची गिते, भारतातील वाड्या, वस्त्यात, अगदी घरा घरात पोहोचली आहेत. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच प्रमाणे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गितावर प्रभावीत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आमची दहा (१०) भाषणे ही वामनदादा कर्डक यांच्या एक गिताच्या बरोबरीची आहे.
एम. जी. एम. विद्यापीठाच्या दुसऱ्या पदविदान समारंभात कुलगुरु डॉ. विलास सपकाळ यांनी जाहीर करुन, विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता, केंद्रीय रस्ते व वहातूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाकवी वामनदादा कर्डक यांना मानद डॉक्टरेट पदवी ( डिलीट) मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या मागील कारण ही तसेच आहे. महाकवी वामनदादाच्या साहित्यावर अनेक विद्यापिठातून अनेक विद्यार्थी पी. एच्. डी. झाले आहेत. तसेच शासनाने अनेक कवी आणि गायकांना डॉ. वामनदादाचे नावे असनारा पुरस्कार देखील देण्यात आले आहेत.
मा. आयुक्त साहेब, आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी ०१ ऑगस्ट पासून पुरा सप्ताह, साहित्यरत्न लोकशाहीर, डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा साजरा करत आहात. तो साजरा झालाच पाहिजे, याबाबत आमचे दुमत नाही. परंतु तसाच शिवराय, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय, उद्देशा प्रती लोक रंजनातून, समाज प्रबोधन करुन, राष्ट्रीय एकात्मतेला साद घालणारे लोक कवी, महाकवी, साहित्यिक डॉ. वामनदादा कर्डक यांचा देखील येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२६ रोजीचा १०४ वा जयंती महोत्सव, आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून, भिमसृष्टी, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी पुणे १८ येथे साजरा करुन, महाकवी डॉ. वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यात यावे.
असे सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, (महाराष्ट्र राज्य), या सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे पालिका आयुक्त, विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब बनसोडे तसेच आमदार महेश लांडगे यांना कळविण्यात आले. यावेळी आयु. बी. बी. शिंदे संस्थापक सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य), आयू. हरिचंद्र शिंदे अध्यक्ष (महा. राज्य), आयु. अशोक जावळे उपाध्यक्ष (महा. राज्य ), आयू. लक्ष्मण सिरसट सचिव (महा. राज्य ), आयु. लक्ष्मण रोकडे कार्याध्यक्ष (महा. राज्य ), आयु. रामभाऊ ओव्हाळ सह संघटक (महा. राज्य ), आयु. देविदास पारधे संघटक (महा. राज्य), आयु. मिलींदराजे भोसले संस्थापक अध्यक्ष सम्राट सेना (महा. राज्य ), आयू. हिना फिरोज तांबोळी महिला अध्यक्षा (पिंपरी चिंचवड शहर), आयु. विठ्ठल लांडगे सचिव (पिंपरी चिंचवड शहर), आयु. विक्रम वाघमारे, आयु. महेंद्र सरवदे, आयु. बाबूराव वक्ते, आयु. गौतम तायडे, आयु. गोविंद गाडे, आयु. दिपक वारभुवन, आयु. बाळासाहेब काळे, आयु. परमेश्वर जगताप, आयु. रामभाऊ ठोके, आयु. गंगाराम जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button