आंदोलनऔद्योगीकपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पथविक्रेत्यांच्या मागणी संदर्भात आमरण उपोषणाचा प्रल्हाद कांबळेंचा इशारा…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.  १४ मे २०२६ पथविक्रेतेच्या मागणी संदर्भात वेळोवेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासणास सदर विषयासंदर्भात वारंवार लेखी पत्र देवुन व प्रत्यक्ष भेटून देखील आपण माझ्या पत्राची दखल घेतली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे असे प्रल्हाद कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात पूढे ते लिहीतात की मी आपणास पुन्हा विनंती निवेदन देतो की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये फेरीवाले, हातगाडी धारक, टपरी धारक, व इतर छोटे मोठे शहरामध्ये व्यवसाय करणारे एकूण १७ ते १८ हजारा पर्यंत फेरीवाले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये फेरीवाले, हातगाडीधारक, टपरीधारक, पथारीधारक यांना पक्क्या गाळयात हॉकर्स झोन झाले पाहिजे, याकरीता केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने धोरण ठरवून दिलेले आहेत. परंतु त्या धोरणाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत अमंलबजावणी केली जात नाही. पथविक्रेत्यांवरती अतिक्रमण विभागामार्फत शहरांमध्ये दररोज अतिक्रमण कारवाई होत असल्याने फेरीवाले धोरणाला केराची टोपली दाखवली जात आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट सिटी होत असल्याने, मा. आयुक्त साहेब, यांनी स्मार्ट हॉकर्स झोन धोरण राबवले पाहिजे, मात्र असे काही होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आमच्या मागण्या खालीलप्रमाणे…

१. पथविक्रेत्यांवर अतिक्रमणाची कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी.

२. पथविक्रेत्यांना ओळखपत्र (ID Card) व अधिकृत परवाने तात्काळ देण्यात यावे ते डो कित्येक वर्षा पासून प्रलंबीत आहे.

३. पथविक्रेत्यांना पक्क्या स्वरूपाचे गाळे उपलब्ध करून देण्यात यावे.

४. पथविक्रेता (उपजिविके संरक्षण व पथविक्रेता) महाराष्ट्र योजना २०१४ अन्वये कायदयाची अंमलबजावणी लवकरात लवकर केली पाहिजे.

५. अधिकृत जागांचे वाटप करून पथविक्रेत्यांना स्थिर व्यवसाय करण्याची संधी देण्यात यावी.

६. स्मार्ट सिटीत हॉकर्स झोनला प्राधान्य दिले पाहिजे.

७. गटई कामगारांना आहे त्या ठिकाणी जागा देण्यात यावी.

८. उर्वरित पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यात यावा.

तरी आमच्या वरील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी प्रल्हाद रामभाऊ कांबळे, संस्थापक अध्यक्ष व पथविक्रेता समिती सदस्य- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर व इतर कार्यकर्ते व पथविक्रेते, फेरीवाले, टपरीधारक, हातगाडीधारक व इतर रस्त्यावरील छोटे व्यवसाय करणारे आम्ही सर्व दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आऊट गेटसमोर,  आमरण उपोषणास बसणार आहोत.
तरी आमच्या वरील मागण्या मान्य करण्यात याव्यात, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण हे सूरूच राहील, सदर आमरण उपोषणामध्ये काही अपरिचित घटना घडल्यास त्यास आपणास (पालिकेस ) जबाबदार धरण्यात येईल, असाही इशारा यावेळी पथविक्रेता समिती संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी पालिका प्रशासनास दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!