अनधिकृतअवैधआरोग्यआर्थिकगून्हाघोटाळेफसवणूकमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

तुकाराम मुंढेंचा ‘पतंजली’वर धडक कारवाईचा बडगा; ७३ लाखांची आयुर्वेदिक औषधे जप्त..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०४ जून २०२६ राज्यात भेसळ आणि फसव्या उत्पादनांविरोधात मोहीम राबवणारे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तूकाराम मुंडे यांनी आता योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ ब्रँडवर मोठी कारवाई केली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील १२ केंद्रांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांची आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली.

एफडीएने ही कारवाई ‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ अंतर्गत केली. भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे औषधांची विक्री केल्याचा आरोप ठेवत नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील पतंजलीशी संबंधित औषध विक्री केंद्रांवर छापे टाकण्यात आले असल्याचे समजते.

या कारवाईत सर्वाधिक जप्ती कोकण विभागातून झाली असून तेथून १८.५८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पुणे विभागातून १४.६८ लाख, नागपूरमधून ७.२६ लाख, नाशिकमधून ७.१० लाख, मुंबईतून १.८५ लाख, अमरावतीमधून १.४२ लाख आणि छत्रपती संभाजीनगरमधून ४८ हजार रुपयांहून अधिक किमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, पुणे विभागातील तपासादरम्यान दोन बनावट ॲलोपॅथी औषधांचा तब्बल २१.८३ लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला. त्यामुळे या कारवाईचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण राहणार आहे. ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही औषधांच्या जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवू नये, स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नयेत आणि संशयास्पद औषधे किंवा अवैध साठवणुकीबाबत एफडीएकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवून तत्काळ चौकशी आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही एफडीएने नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!