त्या ४० हजारांच्या लाच प्रकरणा नंतर श्री. माऊली जगताप यांचेवर पुणे जिल्हा अध्यक्ष पदावरून पदमूक्त करण्याची कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ जून २०२६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेणारे श्री. ज्ञानेश्वर उर्फ माउली जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई आकुर्डी येथिल फकीरभाई पानसरे पिंपरी चिंचवड उर्दू प्राथमिक शाळा येथे गुरुवारी (ता. ३० एप्रिल २०२६) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली होती. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी तीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदाराने त्यांच्या मुलीला ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशासाठी १६ मार्चला ऑनलाइन अर्ज भरला होता. या अर्जाच्या पडताळणीसाठी २७ एप्रिलला ते आकुर्डीतील शाळेत गेले असता त्यांचा अर्ज ‘रिजेक्ट’ झाल्याचे सांगण्यात आले होते.
तेथे त्यांची भेट माउली जगताप या खासगी व्यक्तीशी झाली असता तक्रारदार यांच्या मुलीचा प्रवेश करून पडताळणी अर्जाची पावती देण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे, अशी लाचेची माउली जगतापने मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, त्यानुसार गुरुवारी शाळेत सापळा रचण्यात आला. यावेळी शाळेच्या पहिल्या मजल्यावर आरोपीला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनाचे वतिने श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना जिल्हा अध्यक्ष माउली जगताप यांना जिल्हा अध्यक्ष पदावरून पदमूक्त करण्यात आले.
या पदमुक्त पत्रात नमूद केले आहे की आपल्याला यापूर्वी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, पुणे जिल्हा जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते व आपणास संबंधित पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
मात्र, संघटनात्मक कारणास्तव व प्रशासकीय आवश्यकतेनुसार, आपल्या नियुक्तीचा फेरविचार करण्यात आला असून, आपणास पुणे जिलाध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने पदमूक्त करण्यात येत आहे.
यापुठे आपण श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, पुणे जिल्हा यांचे जिलाध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार नाहीत. तसेच, पदाशी संबंधित सर्व अधिकार, जबाबदाऱ्या, ओळखपत्र, शिबरी शिक्के, कागदपत्रे अथवा इतर कोणतेही साहित्य असल्यास ते संघटनेच्या कार्यालयात जमा करावे.
आपल्याकडे प्रलंबिव असलेल्या कोणत्याही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी कृपया संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अशा स्वरूपाचे पदमुक्त कारवाईचे पत्र दि. १२ जून २०२६ रोजी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना प्रदेश सचिव श्री. अमित आर. भटनागर यांनी दिले आहे.



