आरोग्यउत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

वटपौर्णिमेनिमित्त अंघोळीची गोळी संस्थेच्या महिला टीमकडून वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि २६ जून २०२६ वटपौर्णिमेचा सण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करत अंघोळीची गोळी महिला टीमने वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले. भारतीय संस्कृती आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
“एक छोटासा प्रयत्न, एक मोठा बदल” या संकल्पनेवर आधारित हा वृक्षारोपण कार्यक्रम पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. केवळ पारंपरिक पूजा आणि विधींपुरता वटपौर्णिमेचा उत्सव मर्यादित न ठेवता, महिला सदस्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प केला. भविष्यात सावली, प्राणवायू आणि पर्यावरणीय लाभ देणाऱ्या वडाच्या रोपांची लागवड करून त्यांनी समाजासमोर एक आदर्श आम्ही महिलांनी निर्माण केला असे असे आंघोळीची गोळी संस्थेच्या शहर समन्वयक रेखा रांगोळे म्हणाल्या.
यावेळी रावेत जॉगिंग ट्रॅक परिसरात ही झाडे लावण्यात आली.
यावेळी भावना वाघचौरे, रुपाली वाघचौरे, रेखा कर्डीले, अरुणा मेने, आशा वाघचौरे, सुनंदा तोडकर, सीमा नायक, रुचिता बंडी, निर्मला जगताप, पौर्णिमा कोल्हे, मृणाली डोईफोडे, आयुता रांगोळे, नीरजा देशपांडे, कमल मगर, गौरी गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!