अभिवादनउत्सवधार्मिकभेटीगाठीमहाराष्ट्रशहरसामाजिक

हरी ओम आदिवासी बहुउद्देशीय संस्थेतर्फे ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप..

प्रतिनिधी नवनाथ बी. सोनावणे पुणे ०९ जुलै २०२६ आषाढी वारीसाठी पायी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हरी ओम आदिवासी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत पाणी बॉटल, बिस्कीट आणि केळी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
लांबच्या प्रवासामुळे होणारा श्रम परिहार व्हावा यासाठी संस्थेच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने वाटप केले.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे संस्थेचे सचिव चंद्रकांत गायकवाड यांनी हा सेवा उपक्रम स्वतः हाती घेतला. त्यांच्या समाजसेवेच्या वृत्तीचे कौतुक म्हणून दिंडीचे अध्यक्ष गुलाबराव विठोबा मराठे आणि दिंडी प्रमुख प्रदीप नामदेव कुडेकर महाराज व दिंडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.

या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रुपाली गायकवाड, उपाध्यक्षा सुनीता एन. व्ही. वाडे, सचिव चंद्रकांत गायकवाड खजिनदार रोहित बनकर, समिती सदस्य सुदर्शन राहुल, सदस्य डॉ. आरती डहाळे, दर्शन गायकवाड, प्रज्वल गायकवाड यांसह संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकऱ्यांनी या मदतीबद्दल संस्थेचे मनापासून आभार मानले.
समाजातील वंचित घटकांच्या सेवेसाठी आणि वारकरी परंपरा जतन करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू, असे यावेळी सचिव चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!