अवैधआंदोलनआर्थिकघोटाळेपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या शालेय साहित्य खरेदीत ५० कोटींचा भ्रष्टाचार..

आम आदमी पार्टीचा आयुक्तांना इशारा – ७ दिवसात कारवाई करा. नाही तर तीव्र आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १० जुलै २०२६ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, स्वेटर, बूट इत्यादी साहित्याच्या खरेदीमध्ये सुमारे ५०- ५५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर ने केला आहे.
आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

प्रकरण काय आहे?
१) नियमांचा भंग: ३ लाखांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया बंधनकारक असताना, ती न राबवता थेट एका विशिष्ट संस्थेला कोट्यवधींचे काम देण्यात आले.
२) दरात प्रचंड तफावत: मा. सर्वोच्च न्यायालयाने शालेय साहित्यासाठी ₹ २३९/- दर निश्चित केला असताना, पालिकेने ₹८१४/- प्रति विद्यार्थी दराने पैसे दिले. यामुळे प्रति विद्यार्थी ₹५७५/- ची आणि एकूण सुमारे ५०- ५५ कोटी रुपयांची पालिकेच्या तिजोरीची लूट झाली आहे.
३) पारदर्शकतेचा अभाव: या संपूर्ण व्यवहारात कोणतीही पारदर्शकता न ठेवता करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीची मागणी:
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधित संस्थेवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच लुटलेली रक्कम वसूल करावी.

इशारा:
जर या निवेदनाची दखल घेऊन ७ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही केली नाही, तर आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर तर्फे पालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहर अध्यक्ष वैजनाथ शिरसाट आणि शहर महासचिव स्वप्निल जेवळे यांनी दिला आहे.
पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून लढा देईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!