
लोकांपर्यंत पोहोचणार संविधानाचे महत्त्व…
प्रतिनिधी पूणे दि. ११ जुलै २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, यांच्या वतीने “संविधान दिंडी” या आषाढी वारीमध्येआळंदी ते पंढरपूर या १९ दिवसांच्या प्रवासादरम्यान, संविधानाचे मूल्य, अधिकार आणि प्रस्ताविकेचे महत्त्व जनसामान्यांपर्यत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
संविधान दिंडीमध्ये सहभागी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्य, प्रश्नमंजुषा, संविधान प्रस्ताविकेचे वाटप आणि संविधान जागृतीचे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री. संजय शिरसाठ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच बार्टीचा महासंचालक श्रीम. दीपा मुधोळ -मुंढे यांचे नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
नाना पेठ येथे संविधान दिंडीचे उद्घाटनास बार्टीचे निबंधक डॅा. सुचिता शिंदे , विभागप्रमुख श्रीम. शुभांगी पाटील, विभागप्रमुख श्री. बबन जोगदंड, विभागप्रमुख रवींद्र कदम तसेच सहा. आयुक्त समाजकल्याण पुणे श्री. विशाल लोंढे, श्रीमती शितल बंडगर प्रकल्प अधिकारी बार्टी व बार्टी मुख्यालयातील इतर कर्मचारी व पुणे जिल्हा समतादूत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळेस संविधान दिंडीचे उद्घाटन कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन समतादुत संगीता शहाडे यांनी केले. सर्व वारकरी संप्रदाया सोबत संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना मोफत उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.
संविधानाच्या शिक्षणाची गंगा भक्तिरसामध्ये मिसळून लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठीचा हा उपक्रम नक्कीच समाजजागृतीस चालना देणारा असा हा उपक्रम आहे. या उपक्रमासोबत बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामकाज देखील समता समतादूत यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.



