सुवर्णपदक विजेते प्रा. प्रमोद ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ढगे केमिस्ट्री क्लासेसचा दैदिप्यमान यशाचा झेंडा;

MHT-CET -2026 मध्ये तब्बल ९० विद्यार्थ्यांनी मिळवले ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल
प्रतिनिधी अहिल्यानगर दि. १० जुलै २०२६ गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या बांधिलकीच्या बळावर सुवर्णपदक विजेते प्रा. प्रमोद ढगे यांच्या ढगे केमिस्ट्री क्लासेसने यंदाही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा MHT-CET-2026 मध्ये ८ विद्यार्थ्यांना ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल तर तब्बल ९० विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत घवघवीत यश संपादन केले असून, जिल्हाभरातून या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यामध्ये तन्मय रोकडे (९९.८८ पर्सेंटाइल), श्रद्धा काळे (९९.८१ पर्सेंटाइल), मयुरेश शिंदे (९९.७७ पर्सेंटाइल), ऋतुराज रोकडे (९९.५२ पर्सेंटाइल), ओंकार जवक (९९.५१ पर्सेंटाइल), खुशी गुगळे (९९.२५ पर्सेंटाइल), मयूर पानमंद (९९.०२ पर्सेंटाइल) आणि श्रेया घोलप (९९.०१ पर्सेंटाइल) यांनी विशेष उल्लेखनीय यश मिळवत ढगे केमिस्ट्री क्लासेसच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सुवर्णपदक विजेते प्रा. प्रमोद ढगे हे त्यांच्या प्रभावी, सुलभ आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ज्ञानदानाचा अखंड तप सुरू ठेवला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन तसेच विविध प्रतिष्ठित क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी ढगे केमिस्ट्री क्लासेसमध्ये शिक्षण घेत असून, माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच त्यांच्या यशामागील खरी ताकद मानली जाते.
या यशाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे आणि दयान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास आमदार संग्राम भैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे चे प्राचार्य डॉ. नितीन पी. शेरजे , डॉ. डी. जी. भालके (उपप्राचार्य), डॉ. पुष्पराज वारके (अधिष्ठाता) आणि डॉ. सुशील एस. बेनके ( पी.एच.डी (केमिकल बायोलॉजी), आयसर, पुणे
सदस्य, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, इंग्लंड, व डॉ. डी. बी. करंजुळे (सिनीयर lecturer of Government Polytechnic, Ahilyanagar ) यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या संधी आणि यशस्वी वाटचालीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रियांका पाटील शेळके यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला प्रा. प्रभाकर गवांदे , प्रा. विवेक चौधरी, प्रा. सुरेश जावळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन करण्यासाठी व्यवस्थापक युवराज महांडुळे, सहव्यवस्थापीका मोनाली पवार , मेधा बासकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे प्रा. प्रमोद ढगे यांनी मनःपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांवरील विश्वास, शिक्षणातील गुणवत्ता आणि यशाची अखंड परंपरा या त्रिसूत्रीच्या बळावर ढगे केमिस्ट्री क्लासेसने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, योग्य मार्गदर्शन, जिद्द आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते.



