अभिवादनउत्सवधार्मिकपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

वारकऱ्यांसाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून फराळाचे वाटप..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ जूलै २०२६ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी फराळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला. प्राधिकरण, निगडी येथील अपर तहसीलदार कार्यालयाजवळ (पवळे ब्रिज परिसर) आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाचा वारसा जपत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत वारकऱ्यांचे स्वागत केले आणि फराळाचे वाटप केले. या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेणारी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन पुढील काळातही अशाच सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाचे नियोजन व आयोजन बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, सदस्य ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. संकेत सरोदे यांनी केले व यावेळी ॲड. फारुख शेख, ॲड. विकास शर्मा, ॲड. शांताराम गायकवाड, ॲड. सचिन पाटील, ॲड. भूषण चिंचवडे यांच्यासह बार असोसिएशनचे अनेक पदाधिकारी, माजी पदाधिकारी, सदस्य आणि वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वारकऱ्यांची सेवा करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!