अभिवादनमहाराष्ट्रमूंबईसामाजिक

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई
दि. २८ जुलै २०२६ भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला , तर मृत्यू २७ जुलै २०१५ रोजी झाला. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र (मिसाईल) आणि अण्वस्त्र विकासात मोलाचे योगदान दिले
“स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो; स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत.”- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण केवळ त्यांना श्रद्धांजली वाहू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरविण्याचा संकल्प करूया.

मोठी स्वप्ने पाहा… त्या स्वप्नांसाठी अथक परिश्रम करा… अपयश आले तरी खचू नका,कारण अपयश हेच यशाची पहिली पायरी असते.

शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा, विज्ञाननिष्ठ विचार आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांच्या बळावरच आपण भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, “मी माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या भविष्यासाठी आज काय शिकणार आणि काय घडवणार ?”


डॉ. कलाम यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपा आणि ज्ञान, संस्कार व कठोर परिश्रम यांच्या बळावर यशस्वी, जबाबदार आणि आदर्श नागरिक बनण्याचा निर्धार करा.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भौतिकशास्त्र (Physics) आणि एरोनॉटिकल इंजिनियरिंग (Aeronautical Engineering) विषयात पदवी घेतली होती.
त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र (मिसाईल) आणि अण्वस्त्र विकासात मोलाचे योगदान दिले म्हणून जगात मिसाईल म्हणून ओळख आहे हि सर्व भारतीयांना अभिमानास्पद कामगिरी आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण आदरांजली!

“मोठी स्वप्ने पाहा… मोठे ध्येय ठेवा… आणि ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!