अनधिकृतअमरावतीअवैधमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

तथाकथित सचिवाकडून धर्मादाय उप आयुक्तांच्या आदेशाच्या मर्यादाचे उल्लंघन हुतात्मा पानसरे शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमावा सिध्दार्थ तलवारे यांची मागणी..

प्रतिनिधी नांदेड दि. २८ जुलै २०२६ हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ कुंडलवाडी ता.बिलोली या संस्थेबाबत धर्मादाय उप आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या आदेशाचा गैरवापर करीत आपणच संस्थेचे सचिव असल्याची टिमकी वाजवत बेकायदेशीरपणे वैधानिक अधिकार नसताना घेतलेले धोरणात्मक निर्णय व प्रस्ताव रद्द करून निःपक्ष प्रशासनासाठी स्वतंत्र प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे यांनी धर्मादाय उप आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तथाकथित सचिवांच्या बेकायदा प्रसिद्धीचा खटाटोप देखील पुराव्यानिशी जोडला आहे.
संस्थेच्या बदल अहवालात गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे बदल अहवाल धर्मादाय उप आयुक्त यांच्याकडून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी नामंजूर करण्यात आला होता. तथापी दैनंदिन कामकाजात अडचण येऊ नये म्हणून विद्यार्थी हितासाठी धर्मादाय उप आयुक्त ममता यो.राखडे यांनी १०जुलै २०२६ रोजी कोणतेही धोरणात्मक व दिर्घकालीन निर्णय न घेण्याच्या अटीवर जुन्या विश्वस्तांना परवानगी दिली होती परंतु आदेशाचा विपर्यास करून संस्थेच्या बेकायदेशीर सदस्यांपैकी सुभाष गायकवाड यांनी संस्थेचे सचिव म्हणून निवड झाल्याचा भास निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांना पुरवल्या तसेच शासकीय निमशासकीय कार्यालये, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड आदी कार्यालयात स्वतः ला सचिव म्हणून घेत पत्रव्यवहार केलेला आहे सदरिल हे कृत्य आदेशाच्या मर्यादाचा भंग करणारे आहे. मुळातच बदल अहवालास (चेंज रिपोर्ट) नामंजूर केल्यानंतर त्याच जुन्या संचालक मंडळातील सदस्यांना कारभार चालविण्याची मुभा दिल्यामुळे कायदेशीर सुसंगता वाटत नाही, त्यामुळे सदर संस्थेवर प्रशासक नेमावा व वैधानिक मान्यता नसलेल्या संचालक मंडळाकडून घेतलेल्या निर्णयांची चौकशी करावी तसेच त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करण्यात यावेत अशी मागणी धर्मादाय उप आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनाद्वारे सिध्दार्थ तलवारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!