अभिनंदनकलापूणेमहाराष्ट्रमूंबईविशेषशुभेच्छासामाजिक

मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलन: राज्यस्तरीय कार्यकारी समिती जाहीर!

प्रतिनिधी पुणे  दि. २७ सप्टेंबर २०२६ मुंबई/पुणे- मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध गंभीर प्रश्न, आर्थिक अडचणी, कलाकारांच्या व तंत्रज्ञांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन’ या राज्यव्यापी चळवळीची राज्यस्तरीय कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला तिचे गतवैभव मिळवून देण्यासाठी, प्रादेशिक चित्रनिर्मात्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि मराठी कलाकारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ही समिती लढा देणार आहे.
राज्यस्तरीय कार्यकारी समितीची पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे
  अध्यक्ष: श्री. प्रसाद इंगवले, उपाध्यक्ष: श्री. हर्षल पाटील, श्री. गणेश तळेकर, श्री. सागर खडके, सौ. सुवर्णा नलोडे (महिला उपाध्यक्ष), कार्याध्यक्ष: श्री. सचिन पिंपरीकर, श्री. सतीश आंबर्डेकर, श्री. शेखर म्हात्रे, सौ. सीमा आहिरे (महिला कार्याध्यक्ष), सरचिटणीस: श्री. कृष्णात पाटील, कोषाध्यक्ष: श्री. अक्षय क्षीरसागर, खजिनदार: श्री. दिनेश मुळीक, सचिव: श्री. सोमनाथ मराठे, राज्य संघटन प्रमुख: श्री. भगवान कांबळे, राज्य महिला कलाकार प्रमुख: सौ. स्वप्ना पाटसकर, कार्यकारी संचालक मंडळ: उर्वरित ३५ सन्माननीय सदस्य.
आंदोलनाची मुख्य उद्दिष्टे व भूमिका:

१. शासकीय पाठबळ व अनुदान: मराठी चित्रपटाला राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरील प्रश्न व चित्रपटगृहांचे मिळणारे प्राधान्य यावर धोरणात्मक पाठपुरावा करणे.

२. कलाकार व तंत्रज्ञ हित: मराठी कलावंत, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी व हक्कासाठी ठोस व्यासपीठ तयार करणे.

३. वितरण व्यवस्था सुधारणा: मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये योग्य शो आणि प्राइम टाईम मिळवून देण्यासाठी संघटित लढा उभारणे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आणि अस्तित्वासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यभर संघटन अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
निवेदक: मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलन (राज्य समिती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button