उत्सवधार्मिकमहाराष्ट्रशहरसन- उत्सव

निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची ललित पंचमी पौर्णिमा अति उत्साहात साजरी..

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर दि. २७ सप्टेंबर २०२६ निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थांची पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या पौर्णिमेनिमित्त गावातून स्वामींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखीचे स्वामीभक्त महिलांनी रांगोळी काढून स्वागत केले. पालखी दत्त मंदिरामध्ये आल्यानंतर ह.भ.प.प्राचार्य मधुकर कोथमिरे सर बारामती यांचे प्रवचन झाले. प्रवचनाला सर्व स्वामीभक्त महिला व ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व जप घेण्यात आला त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना श्री सचिन पांडुरंग रणवरे मेजर यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. तसेच पालखीची सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली. मंदिरामधील रांगोळीची सेवा सौ शीतल सुनील टकले यांनी केली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती वालचंद नगरचे स्वामी भक्त श्रीराम कुंभार सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button