आसमानी संकटपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

सवलतींची घोषणा झाली आहे; परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात जाणाऱ्या थेट पीकनुकसान भरपाईचा निर्णय अजून बाकी आहे.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ सप्टेंबर २०२६ “२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर” असे म्हटले जात असले तरी शासन निर्णयाची अचूक भाषा “Trigger‑1 लागू झालेल्या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष उपाययोजना” अशी आहे.

Trigger‑1 म्हणजे पर्जन्यतूट किंवा पावसाचा दीर्घ खंड या प्राथमिक निकषांची पूर्तता. पुढे पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, वनस्पती निर्देशांक, भूजल आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीच्या आधारे नुकसानाचे प्रमाण निश्चित केले जाईल.

विशेषतः, शासन निर्णयातील कलम ३ नुसार:
पीकनुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत या निर्णयात निश्चित केलेली नाही. पंचनामे आणि कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला जाणार आहे.

१. गाव व महसूल मंडळनिहाय पंचनामे किती होणार?

२. प्रत्यक्ष बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या किती असेल?

३. हेक्टरी नुकसानभरपाईचा स्वतंत्र शासन निर्णय कधी आणि किती रकमेचा निघणार?

हे प्रश्न महत्वाचे आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश समन्वयक (सर्व फ्रंटल व सर्व सेल) सुनिल गव्हाणे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button