अभिवादनधार्मिकपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रविशेषशहरशोध इतिहासाचा..सन- उत्सव

“महामंगलमैत्री सोहळा बेडसे लेणी व बोधीचित्तज्ञान बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे मोठ्या उत्साहात संपन्न”

प्रातिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ सप्टेंबर २०२६ काल दि. २७ सप्टेंबर रोजी.” स्वाभिमानी प्रतिष्ठान” आदर्श नगर मोशी पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच वर्षावास भाद्रपद पौर्णिमा व जागतिक पर्यटन दिनानिमित्त महामंगल मैत्री सोहळ्याचे आयोजन बेडसे लेणी व बोधीचित्त ज्ञान बुद्धिस्ट मॉनिस्ट्रीमध्ये करण्यात आले होते. त्यात स्वाभिमानी प्रतिष्ठान, वीर संभाजी जेष्ठ नागरिक संघ, धम्मदूत व धम्मचक्र बुद्ध विहार, धम्म की पाठशाला तसेच पिंपरी चिंचवड मधून २०० बालमित्र,उपासक उपासिकांनी सहभाग घेतला होता.

सकाळी १० वाजता लेणी येथे धम्ममय निसर्गमय वातावरणात बालमित्रांची बुद्धम् शरणम् गच्छामीच्या जयघोषात पंचशील रॅली तसेच हातात फलक घेऊन लेणी प्रचार प्रसार व पर्यावरणाचा सामाजिक संदेश देऊन काढण्यात आली. लेणी मध्ये बुद्ध वंदना होऊन. बालमित्रांनी लेणी अभ्यासक सिरी. अनिल जगताप सरांना प्रश्न विचारून लेणी विषयी माहिती घेतली. त्यांनी आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच बालमित्रांसाठी विशेष लेणी सहल बघितली व त्यांनी आयोजन कर्त्याचे कौतुक केले .बालमित्रांमध्ये लेणी विषयी अधिक जाणून घेण्याची उस्तुकता प्रशंसनीय होती. त्यामुळे मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊन लेणी बद्दल जागरूकता निर्माण झाली. फोटोतील मुलांच्या डोळ्यांमधून, त्यांच्या हावभाव मधून दिसते की त्यांना काय कळले, प्रत्यक्ष डोळ्याने काय दिसले, काय पहिले, काय उमजले, त्यांना काय हवंय, त्यांच्या डोळ्यांमधील आनंद पैशाने मोजता येणार नाही. हे नक्की

दुपारी आदरणीय भदंत बुद्धघोष महाथेरो यांच्यातर्फे मुलांना भोजनदान देण्यात आले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भारत विठ्ठलदास यांचा “विज्ञानवादी” कार्यक्रम खास बालमित्रांसाठी घेण्यात आला. त्याला प्रचंड प्रतिसाद बालमित्रांकडून भेटला. मुलांची प्रश्न विचारण्याची आणि खरे ,खोटे तपासण्याची व अंधश्रद्धा काय आहे. याची जाण त्यांना दिसून आली.
स्वाभिमानी बालमित्रांकडून भंतेजींना धम्मदान देण्यात आले. धम्मदान कसे करावे याचे प्रात्यक्षिकच बाल मित्रांकडून कडून करण्यात आले बालमित्र प्रणय आठवले, अर्णेश वानखेडे , हर्षद शिखरे, पूर्वा, कल्याणी, प्रज्ञा उघडे, अभिनव घनघाव यांनी विशेष भाग घेतला. लेणी व मॉनेस्ट्री मध्ये सर्वीकडे बालमित्रांचा किलबिलाट चालू होता “आदरणीय भदंत बुद्धघोष महाथेरो यांच्याकडून अत्यंत काटेकरपणे नियोजन केलेल्या महामंगलमैत्री सोहळ्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली “भंतेजीकडून आशीर्वाद गाथा घेऊन त्यांच्या व बालमित्रांच्या हस्ते मॉनेस्ट्री मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
येताना वाटेत चटपटा अल्पोपहार करून तळेगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगलो स्मारकाला भेट देऊन बाल मित्रांना स्मारका विषयी खजिनदार संजय गायकवाड यांच्याकडून माहिती देण्यात आली. तसेच स्वाभिमानी प्रतिष्ठानकडून स्मारकाला धम्मदान देण्यात आले सोहळ्यासाठी विशेष करून डॉक्टर सुहास कांबळे व इतर धम्मदान दिलेल्या सगळ्यांचे आभार मानून शेवटी बुद्ध वंदना होऊन सोहळ्याची समाप्ती झाली.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी “मुख्य समन्वयक” धम्म सेवक राजू कांबळे, आदरणीय भदंत बुद्धघोष महाथेरो, बुवासाहेब अहिवळे गुरुजी, झणके आई बाबा, तसेच स्वाभिमानी प्रतिष्ठान आदर्श नगर मोशी पुणे अध्यक्ष नरेंद्र प्रगणे , उपाध्यक्ष रमेश वाघमारे, रमेश केदारी, अशोक तूप सौंदर, निरंजन वानखेडे गुरुजी, प्रणय आठवले, रोहन गवई, अजय रत्न वाकळे, सम्यक तेलगोटे, गुणरत्न प्रगणे, सुभाष वाकळे गुरुजी यांनी विशेष पुढाकार घेतला

वृक्ष लेणी मित्र ज्ञानेश्वर दांडगे, गौतम भोसले, कांचन केदारी, उमेश रोकडे, सुभाष आठवले, भगवान वानखेडे, अर्णव कांबळे, अभी पांडे, प्रज्वल प्रगणे, पृथ्वीराज बोने, आरोही भोसले, आर्यन शाक्य, राहुल पांडे व मुलाणी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button