आंदोलनमहाराष्ट्रवाहतूक कोंडीविशेषशहरसामाजिक

संभाजी ब्रिगेड वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयावर करणार आंदोलन

वाकड रोड डांगे चौकातील वाहतूक कोंडीप्रश्नी संभाजी ब्रिगेड आक्रमक

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० ऑगस्ट २०२६ वाकड रोडवरील डांगे चौक परिसरात अनेक महिन्यांपासून दररोज निर्माण होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे मागील दोन महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संभाजी ब्रिगेडने नाराजी व्यक्त केली आहे. वाकड रोड डांगे चौक परिसरात अनेक वेळा एक एक तास वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहनचालक, नागरिक, विद्यार्थी तसेच परिसरातील व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करून वाहतूक व्यवस्थापन करणे तसेच कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. वारंवार निवेदने देऊनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी सांगितले.

या मागणीसाठी शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर चिंचवडगाव येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या दैनंदिन समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहर अध्यक्ष सतिश काळे, उपाध्यक्ष गणेश देवराम यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!